Home /News /national /

भारतात आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू, मृतांची संख्या 4 वर

भारतात आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू, मृतांची संख्या 4 वर

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) पंजाबमधील (Punjab) एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    चंदीगड 19 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आणखी एका रुग्णाचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. पंजाबमधील (Punjab) एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती 72 वर्षांची आहे. 2 आठवड्यांपूर्वी जर्मनीहून परतली होती. छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल झाली. या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहही होता. तपासणीमध्ये त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. दरम्यान कोरोनामुळे पंजाबमधील सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेणारं पंजाब हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. पंजाबमधील या रुग्णाच्या मृत्यूनंतर देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 4 वर पोहोचला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाबमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात कोरोनाव्हायरसची 18 प्रकरणं आढळलीत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 169 वर पोहोचली आहे. हे वाचा - आता 'हा' देश कोरोनाचा पुढचा लक्ष्य, एकाच शहरात दिवसभरात तब्बल 1 हजार रुग्ण
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या