Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 834 वर, आतापर्यंत 19 जणांनी गमावले प्राण

Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 834 वर, आतापर्यंत 19 जणांनी गमावले प्राण

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 700 पेक्षा जास्त नागरिकांना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशात 700 पेक्षा जास्त जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 19 झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जगात कोरोनाग्रस्तांची संख्या पाच लाखांहून अधिक झाली आहे. तर जगात आतापर्यंत एकूण 22 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात आतापर्यंत 834 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं असून एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 75 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या दोन महिन्यात परदेशातून भारतात आलेल्या प्रवशांची देखरेख करण्याची गरज असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन महिन्यांत परदेशातून भारतात जवळपास 15 लाख प्रवासी आले आहेत.

हे वाचा : पंतप्रधान मोदींच्या Lockdown च्या भाषणाने तोडला IPL आणि नोटाबंदीचा रेकॉर्ड

महाराष्ट्रातही कोरोनाचा आकडा वाढला आहे. विदर्भात पाच जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातील चारजण नागपूरचे तर एक गोंदीया जिल्ह्यातील आहे. यासह नागपूर शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

हे वाचा : चिंताजनक! Coronavirus ची वर्तणूक बदलली? भारतात 15 दिवसांनी दिसली लक्षणं

जगात इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार उडाला आहे. इटलीमध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात तब्बल 919 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इटलीत कोरोनामुळे मृतांची संख्या 9134 झाली आहे.

हे वाचा : असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो

First published: March 28, 2020, 7:29 AM IST

ताज्या बातम्या