देशात कोरोनाचा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक, 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी समोर

देशात कोरोनाचा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक, 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी समोर

कोरोनाचे 24 तासांत तब्बल 18 हजार 552 नवीन रुग्ण आढळले आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 जून : देशात कोरोनाचा विस्फोट होणार का अशी चिंता वाढत असतानाच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचे 24 तासांत तब्बल 18 हजार 552 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 8 हजार 953 वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 1,97,387 एक्टिव केसेस आहेत तर 2,95,880 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कोरोनामुळे देशात 24 तासांत 384 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे.

हे वाचा-नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, सात फेऱ्यांआधीच क्वारंटाइन सेंटरमध्ये भरती

देशात 24 तासांत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडूमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्रात 5024, तमिलनाडूमध्ये 3645, दिल्लीत 3460, तेलंगाना इथे 985 तर उत्तर प्रदेशात 750 नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 तासांतील ही धक्कादायक आकडेवारी असल्यानं चिंता व्यक्त केला जात आहे.

24 तासांत महाराष्ट्रातील मृत्यूचा आकाडा हा 175 तर दिल्लीतला 63 आहे. तमिळनाडूमध्ये 46 तर उत्तर प्रदेशात 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडूमधील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 27, 2020, 10:01 AM IST

ताज्या बातम्या