भारतात कोरोनाचं थैमान, 24 तासांता COVID-19 चा सर्वाधिक वाढला आकडा

भारतात कोरोनाचं थैमान, 24 तासांता COVID-19 चा सर्वाधिक वाढला आकडा

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास 400पर्यंत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : कोरोनाचं थैमान जगभरात सुरुच आहे. कोरोनानं अनेक लोकांचे बळी घेतले आहेत. तर हजारो लोकांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास 400पर्यंत आली आहे. आतापर्यंत 396 जणांना कोरोनाची बाधा झाली असून महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 74 जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात गेल्या तीन दिवसांत ही संख्या वेगानं वाढताना दिसत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारतात 22 राज्यांसह 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भारतात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 24 तासांत 80 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगढ़, झारखंड, जम्मू-कश्मीर, तेलंगाना, आंध्र प्रदेश, नागालैंड, अरुणाचल प्रदेश राज्यांमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

बस सेवा, मेट्रो, लोकल सर्व सेवा बंद करण्यात आल्या असल्यानं गजबजलेल्या रस्त्यांवरही भयाण शांतता पसरल्याची दृश्यं पाहायला मिळत आहेत.

हे वाचा-कोरोनाचा सोशल मीडियावरून अपप्रचार करणाऱ्या दोघांविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल

रविवारी बिहार आणि गुजरातमध्ये कोरोनाचा पहिला तर महाराष्ट्रात दुसरा बळी गेला आहे. मुंबईतील रुग्णालयता 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकूण 3 जणांचा कोरोनांमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून 396 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 74 रुग्ण आहेत. रविवारी 10 नवीन मुंबई आणि पुण्यात असे रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचा-सेहवागच्या कोरोनामुक्त आसनने सारे हैराण, VIDEO पाहून बघा तुम्हाला जमतंय का

First published: March 23, 2020, 8:14 AM IST

ताज्या बातम्या