Home /News /national /

VIDEO : प. बंगालमध्ये स्थानिकांची पोलिसांवर तुफान दगडफेक, 2 पोलीस गंभीर जखमी

VIDEO : प. बंगालमध्ये स्थानिकांची पोलिसांवर तुफान दगडफेक, 2 पोलीस गंभीर जखमी

पश्चिम बंगालमध्ये हावडा जिल्ह्यातील रेड झोन परिसरात पोलिसांवर स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला.

    हावडा, 29 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरचा संसर्ग वेगान वाढत आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर्स आणि पोलिसांवर वारंवार हल्ले होत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये हावडा जिल्ह्यातील रेड झोन परिसरात पोलिसांवर स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रस्त्यावर आलेल्या स्थानिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं. मात्र स्थानिकांनी हुज्जत घालत बाचाबाची सुरू केली त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. या दुर्घटनेमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अधिक कुमक बोलवली. मिळालेल्या माहितीनुसार हावडा इथल्या टिकियापाडा भागात बेलिलियस रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी खूप गर्दी जमा झाली होती. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून अनेक स्थानिक लोक एकत्र फिरताना दिसत होते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार आवाहन करूनही नियमांचं उल्लंघन केलं जात होतं. पोलिसांनी घरी राहण्याचं आवाहन या लोकांना केलं. त्यावेळी संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली ज्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हे वाचा-कोरोनावर लस शोधणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये 'ही' भारतीय शास्त्रज्ञ संतप्त जमावाने काही वाहनांचे नुकसान केले. परिसरातील परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स बोलविण्यात आला. त्यानंतर जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. पश्चिम बंगाल चार जिल्हे आहेत रेड झोनमध्ये पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी एक यादी जाहीर केली की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोलकातासह 4 जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित केले आहे. कोलकाता व्यतिरिक्त हावडा, उत्तर 24 परगणा आणि पूर्बा मेदिनीपूर हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार 11 जिल्ह्यांची नोंद ऑरेंज झोन आणि आठ ग्रीन झोन म्हणून करण्यात आली आहे. ऑरेंज झोनमध्ये दक्षिण 24 परगणा, हुगळी, वेस्ट मेदिनीपूर, पूर्ब वर्द्धमान, कालीमपोंग, नादिया, जलपाईगुडी, दार्जिलिंग, मुर्शिदाबाद आणि मालदा हे जिल्हा आहेत. हे वाचा-3 मेपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर कधी सुरू होणार रेल्वे?आज निर्णय होण्याची शक्यता संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: West bangal

    पुढील बातम्या