धक्कादायक! सॅनिटायझेशन करणाऱ्या तरुणाची सॅनिटायझर पाजून केली हत्या

धक्कादायक! सॅनिटायझेशन करणाऱ्या तरुणाची सॅनिटायझर पाजून केली हत्या

या प्रकरणी पोलिसांनी मोतीपुरा गावातील 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

रामपूर, 19 एप्रिल : संपूर्ण देशभरात आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस, समाजसेवक आणि काही व्हॉलेंटीयर्स कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पुढे येऊन जीव धोक्यात घालून काम करत आहेत. काही समाजकंटक मात्र त्यांच्या कार्यात व्यत्यय आणत आहेत त्यांना त्रास देत आहेत. एकीकडे पोलिसांवर आणि आरोग्य सेवकांवर दगडफेक होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझ करणाऱ्या तरुणाला त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॅनिटायझ कऱणाऱ्या या तरुणालाच अज्ञातांनी जबरदस्ती सॅनिटायझर पाजलं. त्यामुळे तरुणाची प्रकृती बिघडी. तिथल्या स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान या कोरोना योद्धाचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा-कोरोना व्हायरसमुळे 24 तासांत दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार सॅनिटायझरची फवारणी करीत असताना इंद्रपाल आणि त्याच्या साथीदारांच्या पायावर सॅनिटायझर उडाल्यानं रागातून तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर सॅनिटायझर मशीनची पाईप तोंडात घातली आणि त्याला जबरदस्ती पाजलं. हा धक्कादायक प्रकार भोट पोलिस स्थानक परिसरात पेमपूर गावात घडला. पोलिसांनी इंद्रपाल आणि त्याच्या चार साथीदारांसह 5 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर इथे घडली आहे.

एएसपी अरुण कुमार यांनी एनबीटीला दिलेल्या वृत्तानुसार 'मृताच्या भावाने आम्हाला घटनेची माहिती दिली. 14 एप्रिलला मोतीपुरा गावात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझेशन करणं सुरू होतं. त्यावेळी तिथल्या काही अज्ञात गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि सॅनिटायझर पाजलं. त्यानंतर या तरुणाला रामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तरुणाची प्रकृती अधिक खालवल्यानं डॉक्टरांनी मुरादाबादला जाण्याचा सल्ल दिला. मुरादाबाद इथे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मोतीपुरा गावातील 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रिपोर्ट आल्यानंतर पोलीस तपासाची पुढील दिशा ठरवणार आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

हे वाचा-नवऱ्यासोबत भांडून गेली, कोरोनाची लागण झाली, अखेर...

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 19, 2020, 10:49 AM IST

ताज्या बातम्या