संतकबीरनगर, 30 एप्रिल : कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगानं पसरत असल्यानं 3 लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे वाहन उपलब्ध होत नव्हतं. वडिलांच्या उपचारासाठी बहिण आणि वडिलांना घेऊन युवती भटकत होती. जवळपास कोणताही दवाखाना सुरू नव्हता तर मिळालेली सायकल रिक्षाही पोलिसांनी अडवल्यानं अर्ध्यात सोडावी लागली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश इथल्या धनाघाटाच्या काठवटीया भागातली आहे. ही युवती आपली बहीण आणि वडिलांना उपचारासाठी गोरखपूरला घेऊन जात होती. त्यावेळी पोलिसांनी युवतीला अडवलं. लॉकडाऊनमध्ये तिच्याकडे बाहेर जाण्याची परवानगी पोलिसांकडून न घेतल्यानं पोलिसांनी तिला पुन्हा तिच्या गावी जाण्याचे आदेश दिले. वडिलांच्या उपचारासाठी युवती पोलिसांना विनवणी करू लागली मात्र पोलिसांनी ऐकलं नाही.
वडिलांच्या उपचारासाठी ही युवती फिरत राहिली. तिच्या वडिलांवर उपचार करायचे आहेत त्यासाठी गोरखपूरला जाऊ देण्याची विनंती करत राहिली. कुठूनच मदत मिळत नसल्यानं अखेर युवती निराश होऊन पुन्हा 7 किलोमीटर वडिलांना घेऊन घरी गेली. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 2115 रुग्ण आढळले आहेत तर आतापर्यंत 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत 2115 कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. त्यापैकी 1602 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 477 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे. तर उत्तर प्रदेशात कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 जिल्ह्यांमध्ये अजून कोरोनाचे रुग्ण न मिळाल्यानं दिलासा आहे. मात्र इथले लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत.
संपादन- क्रांती कानेटकर