18 वर्षांनंतर मुंबईहून गावी परतला, ना आई जिवंत होती ना बायको

18 वर्षांनंतर मुंबईहून गावी परतला, ना आई जिवंत होती ना बायको

18 वर्षांपूर्वी सोडलं होतं घर, lockownमध्ये परत आला पण...

  • Share this:

कैथवलिया, 23 मे : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याच दरम्यान काम बंद झाल्यानं अनेक मजुरांना शहरांमध्ये आपला उदरनिर्वाह करणं कठीण होत आहे. या मजुरांनी पुन्हा आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. कुणी चालत तर कुणी मिळेल त्या वाहनानं घरी जाण्याची धडपड करत आहे. याच लॉकडाऊनमुळे अनेक विखरलेल्या व्यक्ती कुटुंबात परत आल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील कैथवलिया इथे घडला आहे.

18 वर्षांपूर्वी रागानं घर सोडलेले महंगी प्रसाद लॉकडाऊनमुळे पुन्हा आपल्या गावी परतले. मनात राग धरून त्यांनी घर सोडलं होतं आणि मुंबईला कामाच्या शोधात गेले होते. पण घरी परतल्यानंतर आई आणि पत्नी दोघंही भेटल्या नाहीत. केवळ त्यांची मुलगी घरी दिसली ज्या मुलीला वडिलांची गरज होती त्या काळात महंगी प्रसाद मात्र घर सोडून निघून गेले होते. आज घरात त्यांना फक्त या मुलीची भेट झाली आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

हे वाचा-3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक

तारकुलवा पोलिस स्थानक क्षेत्रातील कैथवलिया गावचा रहिवासी असलेला महंगी प्रसाद 18 वर्षांपूर्वी पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून घर सोडून गेला होता. त्यावेळी ते अंदाजे 40 वर्षांचे होते आणि त्यांचे लग्नही झाले होते. त्यांना एक मुलगीही होती. घरात झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून ते घर सोडून गेले ते 18 वर्षांनंतर आज गावात परतले. 18 वर्षांपूर्वी आई, पत्नी आणि 3 तरुण मुलींना घरी ठेवून मुंबई गाठली आणि उदरनिर्वाहासाठी छोटीमोठी कामं सुरू केली. एका छोट्या कारखान्यात ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करू लागले.

गेल्या 18 वर्षांमध्ये गाव आणि घराची आठवण नाही आली. गावातील लोकांनी महंगी यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काहीच थांगपत्ता लागत नसल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समजून घरच्यांनी दिवस ढकलायला सुरुवात केली. त्यांची घरी परत येण्याची अपेक्षाही कुटुंबीयांनी सोडून दिली.

हे वाचा-धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

कोरोनामुळे मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर सगळी कामं आणि उद्योगधंदे ठप्प झाले. जवऴपास असलेले पैसेही संपले. काही दिवस तहान भूक विसरून गुजराण केली पण मग घरची आठवण येऊ लागली म्हणून त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निश्चय केला. 3500 रुपयांचे भाडं देऊन महंगी प्रसाद अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे पोहोचले. तिथून त्यांनी आपल्या घरापर्यंत पायी प्रवास केला. जावयाला जेव्हा समजलं की आपल्या बायकोचे वडील जिवंत आहेत. तेव्हा मुलगी आणि जावई दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी मुली आणि जावयासोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-पती-पत्नीला कोरोनामुक्त घोषित करुन फुलांची उधळण, नंतर समोर आली धक्कादायक बाब

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading