क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजप महिला नेत्यानं सेलिब्रेट केली Anniversary आणि त्यानंतर...

क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजप महिला नेत्यानं सेलिब्रेट केली Anniversary आणि त्यानंतर...

सोशल डिस्टन्सचं उल्लंघन केल्याप्रकऱणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

बुलंदशहर, 23 एप्रिल : उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाहीय. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात आधीच लॉकडाऊनचे नियम कडक केले आहेत. याच सगळ्यात भाजपच्या महिला नेत्यानं लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिगचे नियम मोडून आपल्या कुटुंबियांसोबत क्वारंटाइन सेंटरमध्ये लग्नाचा 38 वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी भाजपच्या महिला लिडरसह पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इतकच नाही तर या दाम्पत्याची दुसऱ्यादिवशी कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आणखीनं खळबळ उडाली आहे. भाजप महिला नेत्यावर खुर्जा इथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2017 रोजी शिकारपूर इथून त्या नगरपालिका निवडणूक लढल्या आहेत.

फोटो व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. सोशल डिस्टन्सचं उल्लंघन केल्याप्रकऱणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा-महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली, बारामतीत पोलिसाची कॉलर पकडली

अशा परिस्थितीत महिलेच्या जवळ असलेल्या कुटुंबातील सदस्यांकडून संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते आणि त्याचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह मृत डॉक्टरांच्या संपर्कात आले होते. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला रुग्णालयाला सील करण्यात आलं आहे. जिल्ह्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यापैकी एकाचा 10 एप्रिल रोजी मृत्यू झाला.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजार 393 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 हजारहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 681 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 257 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे.

हे वाचा-'कोरोना कधी जीव घेईल काय माहित', डॉक्टर दाम्पत्यानं बनवलं लेकासाठी मृत्यूपत्र

First published: April 23, 2020, 1:23 PM IST

ताज्या बातम्या