Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्या तरुणांना पोलिसांनी रुग्णवाहिकेत डांबलं, पुढे काय झालं पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्या तरुणांना पोलिसांनी रुग्णवाहिकेत डांबलं, पुढे काय झालं पाहा VIDEO

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या तरुणांना तमिळनाडू इथे पोलिसांनी चांगलीच शिक्षा दिली आहे

    चेन्नई, 24 एप्रिल : देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. त्यामुळे 3 मेर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना कुठे मुर्गा तर कुठे उठाबशा तर कुठे काठीचे फटके देण्यात आले. तरीही काही जण ऐकायला तयार नाही. अशा तरुणांना अद्दल घडवण्यासाठी तमिळनाडू पोलिसांनी एक भन्नाट युक्ती लढवली आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या तरुणांना तमिळनाडू इथे पोलिसांनी चांगलीच शिक्षा दिली आहे. हे तरुण तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर हिंडत होते. वारंवार आवाहन करूनही हे तरुण ऐकायला तयार नाहीत हे पाहून पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीनं तरुणांना चांगलीच शिक्षा दिली. पोलिसांनी रुग्णवाहिकेत जबरदस्ती डांबून ठेवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-वर्दीसह आईचंही कर्तव्य बजावतेय कोरोना योद्धा, बाळाला कडेवर घेऊन करतेय ड्यूटी या अॅम्ब्युलन्समध्ये कोरोनाची भीती निर्माण करण्यासाठी एक फेक कोरोना पेशंट ठेवण्यात आला आणि या रुग्णवाहिकेत लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्या तरुणांना डांबून ठेवण्यात आलं. आपल्याला कोरोनाच्या पेशंटसोबत ठेवल्याचा समज या तरुणांचा झाला आणि ते रुग्णवाहिकेतून बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत एक हजार 684 कोरोनाच्या नव्या केसेस समोर आल्या आहेत. तर देशभरात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा देशभरात आकडा 23 हजारवर पोहोचला आहे. त्यापैकी 17 हजार 610 जणांवर देशभरात उपचार सुरू आहेत. हे वाचा-कोरोनाशी कसा लढणार पाकिस्तान? बेड नसल्याने जमिनीवरच सुरू आहेत रुग्णांवर उपचार
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Tamilnadu, Tamilnadu news

    पुढील बातम्या