पोलीस ठाण्यात पोपटांना द्यावी लागली साक्ष, त्यानंतर घेतला 'हा' निर्णय

पोलीस ठाण्यात पोपटांना द्यावी लागली साक्ष, त्यानंतर घेतला 'हा' निर्णय

लॉकडाऊनमध्ये पोपट उडून गेल्यानं ते शोधता आले नव्हते. नियम शिथिल झाल्यानंतर ते सापडले पण त्यासाठी पोपटांनाच पोलिसांमध्ये साक्ष द्यावी लागली.

  • Share this:

जयपूर, 31 मे : राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. राजसमंद जिल्ह्यातील असलेल्या गावात एका मुलाने दोन पोपट पाळले होते. लॉकडाऊनमध्ये ते दोन्ही पोपट उडून गेले होते. लॉकडाऊनमध्ये नियम शिथिल झाल्यानंतर घरच्यांनी पोपटांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा एका महिलेनं दोन्ही पोपट पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचं समोर आलं. मुलाने महिलेकडे पोपट परत करण्याची विनंती केली तर तिने नकार दिला. त्यानंतर मुलानं थेट पोलिसांकडे धाव घेतली.

राजसमंद जिल्ह्यातील कुंवारिया गावात राहणाऱ्या करण सेनने पोपटाची जोडी पाळली होती. यात एकाचे नाव कृष्ण तर दुसऱ्याचं नाव कृष्ण ठेवलं होतं. लॉकडाऊनच्या काळात एकेदिवशी पोपट उडून गेले. त्यावेळी त्यांचा शोध घेता आला नाही. मात्र जेव्हा नियम थोडे शिथिल केले तेव्हा घरच्या लोकांनी बाहेर शोध घेतला. दोन्ही पोपट एका महिलेनं पकडल्याचं समजलं. करणने कुटुंबाला याची माहिती दिली.

हे वाचा-राज्यातून रेड, ग्रीन झोन होणार गायब; संध्याकाळी ठरणार लॉकडाऊनच्या मागचं भविष्य

घरच्या लोकांनी महिलेकडं पोपट परत द्या अशी विनंती केली. मात्र महिलेनं यासाठी नकार दिला.

फक्त 11 वर्षांच्या असलेल्या करणने रडत रडत पोलिस ठाणे गाठले. त्यानं पोलिसांसमोर सांगितलं की, एका महिलेनं त्याचे दोन पोपट पकडले आहेत. ते परत देत नाहीत तुम्ही ते मिळवून द्या. पोलिसांनी महिलेला दोन्ही पोपटांसह पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यानंतर पोपट कोणाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही पोपटांनीच त्यांचा मालक कोण याची साक्ष पोलिसांसमोर दिल्याची माहिती मिळते.

पोलिस अधिकारी पेशावर खान यांनी सांगितले की, करणने जेव्हा राधा कृष्ण अशी हाक मारली तेव्हा दोन्ही पोपट उडून त्याच्या खांद्यावर येऊन बसले. यावरूनच पोलिसांनी दोन्ही पोपट करणचे असून ते त्याला परत करावेत असं महिलेला सांगितलं. त्यानंतर महिलेनं ते पोपट करणला परत दिले.

हे वाचा-पतीनं तिसरं लग्न केल्यानं चिडली दुसरी पत्नी, रागात असा घेतला बदला

हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाइन फसवणुकीचा धोका सर्वाधिक, Google-Microsoft चा इशारा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 31, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading