महापौराची लॉकडाऊनमध्ये दारू पार्टी, पोलिसांची धाड पडताच केलं मेल्याचं नाटक

महापौराची लॉकडाऊनमध्ये दारू पार्टी, पोलिसांची धाड पडताच केलं मेल्याचं नाटक

  • Share this:

पेरू, 23 मे : देशभऱात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून महापौरानं आपल्या मित्र परिवारासोबत दारू पार्टी केली. याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी धाडक टाकली. पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी या महापौरानं अजब शक्कल लढवली आहे. या पार्टीचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. ही संपूर्ण घटना पेरू इथल्या तंतारा कस्बे इथे घडली आहे. महापौर जेमिए रोलांडो यांच्यावर लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार जेमिए रोलांडो आपल्या मित्रांसोबक दारू पार्टी करत होते. त्याचे काही फोटो समोर आल्यानंतर सोमवारी रात्री त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी शवपेटीमध्ये महापौर झोपलेले होते त्यांनी मास्क लावला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पेरूच्या महापौरांनी आपल्या मित्रांसह दारू पिण्यासाठी कर्फ्यू, लॉकडाऊन आणि कायद्याचे उल्लंघन केले. इतकेच नाही तर अटकेच्या वेळीही ते नशेत होते. महापौर आणि त्यांचे मित्र दारू नेमकी कुठे प्यायले याचा अजून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हे वाचा-VIDEO: चुकीच्या पद्धतीनं सिगार ओढणं पडलं महागात, अशी झाली उर्वशी रौतेलाची अवस्था

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महापौराला अटक करण्यासाठी जेव्हा पोलीस त्यांच्या घरी जायचे तेव्हा ते शवपेटीत झोपलेले असायचे. बऱ्याच नाटकानंतर पोलिसांनी सापळा रचून या महापौरांच्या नाटकाचं भिंग फोडलं आहे. बर्‍याच नाटकानंतर महापौरांना अटक करण्यात आलं.

केंद्र सरकारने पेरूसह इतर ठिकाणीही 66 दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. पेरुसह शहरात फक्त आठ दिवस घालवले आहेत आणि स्थानिक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अयशस्वी ठरले आहे.

हे वाचा-महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, कोरोनाबाधित रुग्णांबाबत नवीन आकेडवारी समोर

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading