कोरोनामुळे काळजाच्या तुकड्याला शेवटची मिठीही मारू शकला नाही बाप, मुलावर असे केले अंत्यसंस्कार

कोरोनामुळे काळजाच्या तुकड्याला शेवटची मिठीही मारू शकला नाही बाप, मुलावर असे केले अंत्यसंस्कार

वडिलांना आपल्या धाकट्या मुलाला शेवट्या श्वासापर्यंत मिठीही मारता आली नाही. या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय होता.

  • Share this:

पानिपत, 04 एप्रिल : कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार घराबाहेर पडू नये असं आवाहन करत आहे. मात्र सरकार हे आवाहन नागरिक गांभीर्यानं घेत नाहीत असं दिसून आलं आहे. हा संसर्ग जीवघेणा आणि किती भयानक आहे याची जाणीव अजून लोकांना झाली नाही. या व्हायरसमुळे ती व्यक्ती केवळ आपला जीव गमावत नाही तर संसर्ग झाल्यानंतरही कुटुंबास त्याचा चेहरा पाहता येत नाही. पानिपत इथेही असााच प्रकार घडला. वडिलांना आपल्या धाकट्या मुलाला शेवट्या श्वासापर्यंत मिठीही मारता आली नाही. या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांना त्याला शेवटचं जवळ घेता आलं नाही.

वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. कोरोनाची भीती एवढी होती की वडिलांनी मुलाला खांदा देण्यासाठी लोकांना पैसे देऊन बोलवलं तरी यायला नकार देत होते. वडिलांना मुलाच्या पार्थिवाजवळ जाण्याआधी डॉक्टरांनी त्यांना कोरोना किट घालण्यासाठी दिलं. त्यानंतर वडिलांनी मुलाचं पार्थिव उचलून गाडीत ठेवलं. पोलीस किंवा रुग्णालयातील स्टाफही मदतीला येण्यासाठी तयार नव्हता.

हे वाचा-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500च्या वर, रात्रभरात सापडले 47 नवे रुग्ण

पार्थिव रुग्णवाहिकेतून आणण्यात आले त्यावेळी चितेवर ठेवण्यासाठीही कुणीच मदत केली नाही. वडिलांनी मोठ्या भावाच्या मदतीनं पार्थिव स्ट्रेचरवरून चितेवर नेऊन ठेवलं. पार्थिव नेत असताना वडिलांचे हात थरथर होते त्यामुळे खाली पडलं मात्र पोलीस आणि रुग्णवाहिकेतील लोक संसर्गाच्या भीतीनं पुढे सरसावले नाहीत. अखेर वडिलांनीच पार्थिव चितेवर ठेवलं आणि मोठ्या भावानं मुखाग्नी दिला. अशा परिस्थिती कुणावरच येऊ नये असं वडिलांनी प्रार्थना केली आहे.

या संपूर्ण घटनेनंतर वडील आणि मोठ्या भावाला 24 तासांसाठी घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यानंतर या दोघांचीही चाचणी करण्यात आली ती निगेटिव्ह आली आहे. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी एकही नातेवाईक आला नाही ना कुणी मदत केली. कोरोनाच्या भीतीनं तर शेवटचं घट्ट जवळही घेता न आल्याचं दु:ख वडिलांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचा-मरकजमधील लोकांना गोळ्या घालून ठार करा, राज ठाकरे भडकले

First Published: Apr 4, 2020 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading