Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये नांगरणीआधी आजारी पडले बैल म्हणून थेट मुलांना जोताला जुंपलं

लॉकडाऊनमध्ये नांगरणीआधी आजारी पडले बैल म्हणून थेट मुलांना जोताला जुंपलं

छिंदवाड्यात भाजीपाला पीक खराब झाल्यानंतर शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला

    छिंदवाडा, 24 मे : देशभरात लॉकडाऊनमुळे शेतकरी आणि मजुरांचे हाल होत आहेत. मन अस्वस्थ करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथला असल्याचं सांगितलं जात आहे. या शेतकऱ्याचे बैल अचानक आजारी पडल्यामुळे शेतीची कामं अडकून राहिली होती. शेतीची काम अडकल्यामुळे त्यांनी अखेर आपल्या मुलांना जोताला जुंपलं आणि नांगरणी केली. आधीच घरात गरिबी त्यामुळे बैलांच्या उपचारासाठी पुरेसे पैसेही नव्हते त्यामुळे नुकसान झालं. शेतकरी जयदेव यांच्याकडे दोन एकर जमीन असून त्यात भाजीपाला पिकवून आपल्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. शेतकरी जयदेव दास यांना दोन मुले आहेत. एकाचे नाव राजेश आणि दुसरे देव आहे. दोन्ही मुलं मजूर म्हणून काम करतात आणि वडिलांसोबत शेतीतही काम करतात. हे वाचा-अखेरचा प्रवासही वेदनादायी, अन्न-पाण्यावाचून मजूर तरुणाचा असा झाला शेवट! छिंदवाड्यात भाजीपाला पीक खराब झाल्यानंतर शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला, सावळ बारी इथे राहणारे शेतकरी जयदेव दास यांनी आपल्या मुलांना जोताला जुंपले आणि नांगरणी केली. शेतकरी जयदेव दास यांनी सांगितले की त्याच्याकडे दोन बैल आहेत पण एक बैल आजारी झाला आहे व बैलावर उपचार घेण्यासाठी किंवा नवीन बैल खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. आधीच आर्थिक परिस्थिती जमतेम असताना आलेला माल लॉकडाऊनमध्ये सडून खराब झाला त्याची उचल न झाल्यामुळे मोठं नुकसान झालं. कोरोनाच्या महासंकटामुळे त्यांचा माल विकला जात नसल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं तर सध्या बैलही घेण्याची परिस्थिती नसल्यानं मुलांना जोताला जुंपून नांगरणी करावी लागली असं शेतकऱ्यानं सांगितलं आहे. हे वाचा-राज्यात विमानसेवा सुरू न करण्याबाबत गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, म्हणाले... हे वाचा-पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या