मुख्यमंत्री हात जोडून म्हणाले... 'प्लीज मास्क वापरा', पाहा VIDEO

मुख्यमंत्री हात जोडून म्हणाले... 'प्लीज मास्क वापरा', पाहा VIDEO

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान स्वत: रस्त्यावर उतरुन नागरिकांना आवाहन करत असल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

भोपाळ, 28 मार्च : मध्य प्रदेशात कमलनाथ यांची सरकार उलथवल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान यांनी शपथ घेतली आणि पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली. देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरु असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान स्वत: रस्त्यावर उतरुन नागरिकांना आवाहन करत असल्याचं पाहायला मिळालं. देशभरात कोरोनामुळे 830 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय त्याचा संसर्ग वेगानं पसरत आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी सध्याची परिस्थिती समजून त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह रस्त्यावर उतरून येणाऱ्या फिरणाऱ्या नागरिकांना हात जोडून आवाहन करत आहे. मास्क घालण्याची विनंती करत आहेत.

हे वाचा-'श्वासही घेता येत नव्हता पण...', कोरोनाला हरवल्यानंतर खेळाडूनं सांगितला अनुभव

त्यांचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 98 लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 3 जणांनी रिट्वीट केला आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण 830 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 तरुणांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात 35 वर्षांच्या आणि बिहारमध्ये 38 वर्षांच्या तरुणाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.

हे वाचा-तब्बल 3 हजार लावणी कलावंतांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

First published: March 28, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या