धक्कादायक! केस कापायला गेले आणि कोरोना घेऊन आले, 6 जणाना लागण

धक्कादायक! केस कापायला गेले आणि कोरोना घेऊन आले, 6 जणाना लागण

कोरोनाच्या काळात सलूनमध्ये जाऊन केस कापणं 6 जणांना चांगलच महागात पडलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण गाव सील केलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 26 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगानं वाढत आहे. कधी कुठे कसा कोरोना आपल्या मागे लागेल काही सांगता येत नाही. राजस्थानमध्ये एटीएममधून कोरोनाचं संक्रमण झाल्याचा संशय तर आता एक सलूनमधून कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाच्या काळात सलूनमध्ये जाऊन केस कापणं 6 जणांना चांगलच महागात पडलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण गाव सील केलं असून ग्रामस्थांना होम क्वारंटाइन केलं आहे. केस आणि दाढी करणाऱ्यानं सर्वांना एकच अॅप्रन वापल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.

खरगोन इथल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्येश वर्मांनी दिलेल्या माहितीनुसार इंदूरमधील हॉटेलमध्ये काम करणारे बडगाव इथला एक तरुण गावी परत आला आणि स्थानिक सलूनमध्ये केस कापले. त्याचसोबत त्याने दाढीही केली. त्यानंतर तरुणाची तब्येत बिघडल्यानं त्याची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं. सलूनमध्ये गेलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी एकूण 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर तातडीनं गाव सील करण्यात आलं आहे.

हे वाचा-20 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा सर्वनाश होणार, सिंघापूर युनिव्हर्सिटीचा दावा

मध्य प्रदेशातील बडगाव इथे आतापर्यंत 60 जण कोरोनाग्रस्त आहेत. मागच्या 2 दिवसांत नवीन 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात मागच्या 24 तासांमध्ये 1990 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात 824 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 5 हजार 803 रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे.

हे वाचा-अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं? मुंबईतले दर पाहाल तर...

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 26, 2020, 10:58 AM IST

ताज्या बातम्या