तिरुवनंतपुरम, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसचं देशभरात थैमान सुरू आहे. केरळमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे 3 मे पर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीच वाहन मिळत नाही तर दुसरीकडे रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाहीत. लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णलयातून उपचार पूर्ण झालेल्या वडिलांना घेऊन जाण्यासाठी तरुणानं रिक्शा बोलवली. मात्र लॉकडाऊनमुळे पोलिसांनी रिक्षालाही रस्त्यात अडवलं. एक किलोमीटर गेल्यानंतर पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम दाखवत रिक्षाला अडवलं आणि पुढे जाण्याची परवानगी न दिल्यानं रिक्षा थांबवावी लागली. घरी जाण्यासाठी श्रावण बाळासारखं मुलानं अखेर आपल्या वडिलांना उचलून घरी नेलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे वाचा-धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये 3 तर पालघरमध्ये 10 जणांना कोरोनाची लागण
#WATCH Kerala: A person carried his 65-year-old ailing father in Punalur & walked close to one-kilometre after the autorickshaw he brought to take his father back from the hospital was allegedly stopped by Police, due to #CoronavirusLockdown guidelines. (15.4) pic.twitter.com/I03claE1XO
— ANI (@ANI) April 16, 2020
12.8 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आतापर्यंत 235 जणांनी रिट्वीट केला आहे. दरम्यान केरळ सरकारनं मेडिकल इमर्जन्सीसाठी गाड्यांना पास द्यावेत. केरळमध्ये अशा घटनांमध्ये सेवा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे या मुलाचं कौतुकही केलं आहे.
देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जगातल्या ज्या मोजक्या देशांनी उपाय योजना सुरू केली त्यात भारताचा समावेश होता असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.
हे वाचा-महाभयंकर Coronavirus चा नाश कधी होणार? शास्त्रज्ञांनी दिलं असं उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms