Home /News /national /

कोरोना संशयितांचा तुफान राडा, पोलिसांसमोरच तोडफोडीचा VIDEO VIRAL

कोरोना संशयितांचा तुफान राडा, पोलिसांसमोरच तोडफोडीचा VIDEO VIRAL

क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर कोरोना संशयितांनी केली तोडफोड

    बंगळुरू, 20 एप्रिल : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. हा वेगानं वाढत असणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या संशयितांना क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत तुफान बाचाबाची झाली. यामध्ये कोरोना संशयित असलेल्या व्यक्तींनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर दादागिरी करत तुफान राडा घातला. त्यांनी आजूबाजूला असलेल्या गोष्टींची तोडफोडही केली आहे. पोलीस आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. पोलिसांनी बळाचा वापर करून ह्या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण मिळवलं आहे. ही घटना कर्नाटकातील पडरयानपुरा इथे रविवारी घडली असल्याची माहिती मिळत आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून 54 जणांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात हे तरुण आले होते. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन कऱण्यासाठी बंगळुरू महापालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. क्वारंटाइन होण्याऐवजी तरुणांनी दादागिरी सुरू केली. तिथे झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर पुढे तोडफोडीमध्ये झालं. हे वाचा-ALERT! महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये समोर आले धक्कादायक आकडे, कोरोनाच कहर वाढला कर्नाटकात कोरोनाग्रस्तांची संख्या 300 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण बंगळुरूमधील आहेत. भारतात आतपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी 2302 रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासा देणारी बाब आहे. यासह देशातील साथीच्या आजाराची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 17265 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 543 वर पोहोचला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 1553 नवी प्रकरणं समोर आली असून 36 जणांना देशभरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हे वाचा-बारामती पुन्हा एकदा हत्याकांड, जेलमधून सुटलेल्या मानसिक रुग्णाने केला खून संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या