लॉकडाऊनमध्ये प्रियकरासाठी सोडलं घर, क्वारंटाइन सेंटरमध्ये गेली आणि...

लॉकडाऊनमध्ये प्रियकरासाठी सोडलं घर, क्वारंटाइन सेंटरमध्ये गेली आणि...

दोघांच्याही घरी विरोध असल्यानं तरुणी प्रियकरासाठी घर सोडून क्वारंटाइन सेंटरमध्ये आली.

  • Share this:

रांची, 01 जून : एखाद्या सिनेमात दाखवतात तसं प्रियकरासाठी जीवाची पर्वा न करता सगळं सोडून यायला तयार असलेल्या प्रेयसीचं धाडस आणि प्रेम पाहिलं असेल. असाच प्रकार झारखंडमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये पाहायला मिळाला. एका क्वारंटाइन सेंटरमध्ये प्रेमी युगुल राहात आहे. दिवसभर एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्यांचं प्रेम व्यक्त करत आहेत. या क्वारंटाइन सेंटरमध्ये इतर मजूरही आहेत मात्र त्यांना कोणताही त्रास नाही असं त्यांनी सांगितलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून फक्त डोळ्यांनी एकमेकांशी या प्रेमी युगुलाचा संवाद चालू असतो.

दरम्यान झारखंडमधील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये आंध्र प्रदेशातून आलेल्या प्रियकराला ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तरुणीनं आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निश्चय केला आणि घर सोडून थेट क्वारंटाइन सेंटर गाठलं. मिळेलेल्या माहितीनुसार ही तरुणी नुतनडीह गावची रहिवासी आहे.

या दोघांचा प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध असल्यानं त्यांचं लग्न होऊ नये यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू आहेत. या तरुणीनं आपल्या प्रियकरासाठी सगळं सोडून क्वारंटाइन सेंटर गाठल्याची माहिती घरच्यांना मिळाली. कुटुंबियांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये जाऊन प्रियकराला आणि तरुणीला धमकावलं आणि शिवीगाळही केली. त्यानंतर या प्रेमीयुगुलानं घरच्यांच्या भीतीनं क्वारंटाइन सेंटरमधून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमी युगुल क्वारंटाइन सेंटरमध्ये आलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनाही आता एकाच क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. नूतनडीह इथला हा तरुण आणि कोलडीह इथली तरुणी या दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्यानं दोन वर्षांपूर्वी विवाह केला होता. दोघांनाही एकत्र राहायचं होतं मात्र कुटुंबीयांच्या विरोधामुळे ते शक्य झालं नाही. आता ग्रामस्थांनी दोघांनाही क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 1, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading