92 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात, व्हायरससोबत लढण्याचं सांगितलं सिक्रेट

92 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात, व्हायरससोबत लढण्याचं सांगितलं सिक्रेट

या आजोबांनी कोरोनालाच हरवलं नाही तर इतर रुग्णांना आणि तरुणांनाही जगण्याचा मंत्र दिला आहे. हार मानायची नाही हा त्यांचा फंडा.

  • Share this:

जयपूर, 09 मे: देशभरात कोरोना व्हायरसनं अक्षरश: थैमान घातलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 हजार 500 हून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मूळचे जयपूरचे रहिवासी असणाऱ्या 92 वर्षांच्या भवानी शंकर शर्मा यांनी कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे. त्यांनी केवळ कोरोनालाच हरवलं नाही तर इतर रुग्णांना आणि तरुणांनाही जगण्याचा मंत्र दिला आहे. हार मानायची नाही हा त्यांचा फंडा. 13 एप्रिल रोजी भवानी शंकर शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. 28 एप्रिलला त्यांच्याववरील उपचार यशस्वीपणे पार पडले आणि टेस्ट केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर भवानी शंकर शर्मा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी कोरोनावर कशी यशस्वीपणे लढा दिला याबद्दल सांगितलं आहे.

या आजोबांनी फक्त कोरोनाविरुद्ध फक्त कोरोनावर मात केली नाही तर जगण्याचा मंत्र दिला आहे. ते सांगतात की, 'माझे तसे फार मित्र परिवार नाही. मी ठिक होऊन घरी परतलो तर त्यामागचं महत्त्वाचं कारण माझं कुटुंब आहे. कारण, माझ्या सर्व मित्रांनी निरोप घेतला. कुटुंबातील व्यक्तींसोबत मला वेळ घालवायचा होता मला त्यांना पाहण्याची तीव्र इच्छा होती. वयानुसार माझी देवाकडे कोणतीच तक्रार नव्हती. पण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती. मला जगायचं होतं. फक्त एकदा कुटुंबाला भेटण्याची इच्छा होत. माझी दोन्ही मुले सेवानिवृत्त डॉक्टर आणि इंजिनियर आहेत. त्यांच्यासोबत मला वेळ घालवायचा होता.'

हे वाचा-कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाची लढाई, नवरा गमावला आता पत्नीचाही व्हायरसशी लढा

'मी स्वत:ला कधीही कमजोर समजत नव्हतो. उपचारादरम्यान मी रोज सकाळ-संध्याकाळ व्यायाम-योग करायचो. आवडती गाणी ऐकली आणि देवावर विश्वास ठेवला कारण आता सगळं त्यांच्या हातात आहे हे मी स्वीकारलं होतं. मात्र एक टक्केही मनात नकारात्मक विचार येऊ दिले नाहीत. त्यामुळे मला या आजारावर मात करण्याचं बळ मिळालं. याशिवाय इतक्या वर्षात कोणतंही व्यसन किंवा नशा केली नाही. त्यामुळे मला डायबेटिस किंवा साधे बीपी सारखे आजारही झाले नाहीत. मला खूप चालायची आवड आहे. त्यामुळे मी खूप पायी चालायचो. आयुष्यभर चालण्याचा आणि कामातून मोकळा वेळ न मिळवण्याचा माझा छंद मला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात काही आला. घरात त्यांनी स्वत:ची बाग तयार केली आहे.'

सध्या भवानी शंकर शर्मा होम क्वारंटाइन आहेत. आपला वेळ योग, व्यायाम, घरातील बाग सजवण्यात वेळ घालवतात. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

हे वाचा-मुंबईत 24 तासांत 748 रुग्ण वाढले; राज्याचा आकडा 19000 वर

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 9, 2020, 9:03 AM IST

ताज्या बातम्या