Home /News /national /

सावधान! स्टेज 3 चा Coronavirus आहे महाभयानक, तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी होईल अवस्था

सावधान! स्टेज 3 चा Coronavirus आहे महाभयानक, तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी होईल अवस्था

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

सुदैवानं आपण अद्यापही कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या टप्प्यात (stage) आहे.

    नवी दिल्ली, 23 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) रुग्ण वाढत आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मृत्यूचा आकडाही आता वाढला आहे. मात्र तरीही भारत आणि महाराष्ट्र (Maharashtra) कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात (second stage) आहे. त्याचवेळी सरकारनं कठोर पावलं उचलली जेणेकरून आपण कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात (third stage) पोहोचू नये आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. कोरोनाव्हायरसचा हा दुसरा आणि तिसरा टप्पा म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कोरोनाव्हायरसच्या दुसरा टप्पा पाहूनच आपली अशी हालत झाली आहे, मग तिसऱ्या टप्पा तर इतका महाभयानक आहे की त्याची तुम्ही कल्पनाही केली नाही. हे वाचा - कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती कोरोनाव्हायरसचा तिसरा टप्पा समजून घेण्यासाठी आधी त्याचे सुरुवातीचे 2 टप्पे समजून घ्या. इंडियन मेडिकल ऑफ काऊन्सिल रिसर्चने (Indian Council of Medical Research - ICMR) या टप्प्यांबाबत माहिती दिलेली आहे. पहिला टप्पा - परदेशाहून भारतात आलेली प्रकरणं ज्या व्यक्तींनी परदेशात प्रवेश केला आहे, अशा व्यक्तींना व्हायरसची लागण. ज्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रसार झाला आहे, अशा देशातून भारतात परतलेले नागरिक आणि त्यांना कोरोनाव्हायरसची लागण होणे. दुसरा टप्पा - लोकल ट्रान्समिशन कोरोनाव्हायरसचा प्रसार झालेल्या देशातून भारतात परतलेल्या नागरिकांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असताना त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला त्यांनादेखील कोरोनाव्हायरसची लागण होणं. या टप्प्यात नेमकी कोणाकोणाला व्हायरसची लागण झालेली आहे, याचा शोध घेता येतो, त्यामुळे व्हायरसचा प्रसार रोखता येतो. तिसरा टप्पा - कम्युनिटी ट्रान्समिशन हा असा टप्पा ज्यामध्ये आपण जाऊ नये, यासाठी सरकार कठोर अशी पावलं उचलत आहे. या टप्प्यामध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नसतो किंवा परदेशाहून आलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीशी तिचा संपर्क आलेला नसतो. एकंदर त्या व्यक्तीला व्हायरसची लागण नेमकी कुठून आणि कशी झाली, याचा धागादोरा सापडत नाही व्हायरसचा स्रोत समजत नाही आणि व्हायरस सर्वत्र पसरू लागतो. चौथा टप्पा - एपिडेमिक हा कोरोनाव्हायरसचा सर्वात शेवटचा आणि भयंकर असा टप्पा.  झपाट्याने हा व्हायरस सर्वांमध्ये पसरतो, जी परिस्थिती चीनची झाली आणि आता इटली या टप्प्यातून जातं आहे. हे वाचा - मुंबईकरांच्या या स्पिरिटमुळे धोका आणखी वाढणार... कोरोनाव्हायरसचे टप्पे पाहिल्यानंतर भारत आणि महाराष्ट्र सध्या ज्या टप्प्यात आहे.  त्या टप्प्यात कोरोनाव्हायरसला नियंत्रणात करणं शक्य आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांचं पालन करा, सहकार्य करा. जेणेकरून कोरोनाव्हायरसला तिसऱ्या टप्प्यात आपण पोहोचूच देणार नाही आणि कोरोनाव्हायरसवर सर्वजण मिळून यशश्वीरित्या मात करू. हे वाचा - रस्त्यावर उतरलात की थेट जेलमध्ये होईल पाठवणी, अशी होणार तुमच्या कठोर कारवाई
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या