बापरे! भारतात कम्युनिटीमार्फत कोरोनाचा प्रसार? व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा स्रोतच सापडला नाही

बापरे! भारतात कम्युनिटीमार्फत कोरोनाचा प्रसार? व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा स्रोतच सापडला नाही

तामिळनाडूतील (Tamilnadu) दुसऱ्या कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णाने परदेश दौरा केला नव्हता किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींशी त्याचा संपर्क आला नव्हता.

  • Share this:

चेन्नई, 19 मार्च : भारत (India) अद्यापही कोरोनाव्हायरस (Coronavirus) दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र तामिळनाडूतील (tamilnadu) एका रुग्णाला कोरोनाव्हायरची लागण नेमकी कशी झाली हे अद्याप समजलेलं नाही. या रुग्णाच्या व्हायरसचा स्रोत सापडलेला नाही. त्यामुळे आता हा आजार पुढील टप्प्यात पोहोचला की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

तामिळनाडूत एका 20 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मात्र या व्यक्तीला या व्हायरसची लागण कशी झाली, याचे धागेदोरे सापडलेले नाहीत. या व्यक्तीने कोणताही परदेश दौरा केलेला नाही किवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी त्याचा संपर्क आलेला नाही. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी हे प्रकरण भारतातील कोरोनाव्हायरसचं पहिलं डोमेस्टिक (domestic) प्रकरण असावं असं म्हटलं आहे.

हे वाचा - संसदेत पोहोचला Coronavirus? खासदारांनी सुरू केलं सेल्फ क्वारंटाइन

या व्यक्तीने कामानिमित्त दिल्लीहून चेन्नईला ट्रेनने प्रवास केला. त्यानंतर त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एपिडिमिओलॉजिकल आणि कम्युनिकेबल डिसीजचे डॉ. रमन गंगाखेडकर म्हणाले, “रुग्णाने सांगितलेल्या तपशीलावर विश्वास ठेवायलाच हवा. या रुग्णाचा कोरोनाव्हायरस रुग्णाशी संपर्क आलेला नाही. आम्ही पुढील तपासणी करत आहोत"

या रुग्णावर चेन्नईतील राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतात व्हायरसचा कम्युनिटी ट्रान्समिशन तर झालं नाही ना, यासाठी ICMR ने फेब्रुवारीपासून आतापर्यंत 826 नमुने तपासलेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून हे नमुने घेण्यात आलेत आणि सर्व नमुने नेगेटिव्ह आहेत.

हे वाचा - केरळमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 12 जणांना ‘कोरोना’ची लागण, देशातली संख्या 223वर

First published: March 20, 2020, 9:01 PM IST

ताज्या बातम्या