Home /News /national /

ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलेल्या पत्रानंतर आता केंद्र सरकार उचलणार मोठं पाऊल

ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलेल्या पत्रानंतर आता केंद्र सरकार उचलणार मोठं पाऊल

Coronavirus च्या लढ्यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं. या पत्राची तातडीने दखल घेण्यात आली आहे. केंद्र सरकार आता एक मोठा निर्णय घेऊ शकतं.

    कोलकाता, 23 मार्च : देशभरात Coronavirus हाहाकार माजवत असताना बहुतेक सगळी मोठी शहरं लॉकडाउन आहेत. अशा वेळी देशांतर्गत विमानसेवा मात्र सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या लॉक डाउनमध्ये अडथळे येत असल्याने याचा गांभीर्यानं विचार करावा, अशा अर्थाचं पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं. मोदींना लिहिलेल्या या पत्राची तातडीने दखल घेण्यात आली आहे. विमानांमध्ये किंवा विमानतळांवर social distancing अर्थात एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर राहण्याचा नियम पाळू शकत नाही. त्यामुळे चिंता वाटत असल्याचं ममता यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्याची गांभीर्याने दखल घेत आता नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा विचार करत आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकार त्याप्रमाणे राज्य सरकारांना सूचना देत आहे. पण देशांतर्गत विमानप्रवास बंद करण्याची मागणी आतापर्यंत विचारात घेतली गेली नव्हती. वाचा - कोरोनाग्रस्त महिलेचा पुणे ते वेल्हा गावापर्यंत प्रवास, तब्बल 26 गावं क्वारंटाइन ममता बॅनर्जी यांच्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांनी दिल्लीत येणारी विमानं बंद करण्याची मागणी केली होती. पण ती केंद्र सरकारने मान्य केली नव्हती. आता मात्र दुसऱ्या राज्याकडूनही अशी मागणी होत असल्याने केंद्र सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे. वाचा - 'लोकांना हात जोडून विनंती, पोलिसांनी हात सोडले तर महागात पडेल'
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या