नवी दिल्ली, 30 मार्च : देशात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) झपाट्याने पसरतो आहे. गेल्या 24 तासांत 92 रुग्ण आढळलेत, तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता 1071 वर पोहोचला आहे, तर एकूण मृतांची संख्या आता 29 झाली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
हे वाचा -
मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू, राज्यात मृतांची संख्या 10 वर
महाराष्ट्रात आज दिवभरात 12 नवे रुग्ण आढळलेत. पुण्यात 5, मुंबईत 3, नागपुरात 2 आणि कोल्हापूर, नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या 216 वर पोहोचली आहे. तर आज मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एक अशा 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे राज्यात आता एकूण मृतांचा आकडा 10 झाला आहे.
भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सगळ्यात भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 102 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं कोरोनाला हरवणे शक्य असल्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात 102 रुग्ण निरोगी झाल्यामुळं भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे.
हे वाचा -
लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्यांना मिळणार मोठा दिलासा, सरकार देणार पगार?
कोरोनाव्हायरस जास्त पसरू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन जाहीर केला. 25 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन 21 दिवसांचा आहे.14 एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. कोरोनाचे (Corornavirus) संक्रमण थांबवण्यासाठी हे लॉकडाऊन गरजेचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.