Home /News /national /

फक्त लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थांबणार नाही- राहुल गांधी

फक्त लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थांबणार नाही- राहुल गांधी

टेस्टिंग क्षमता वाढवण्याची गरज, एका जिल्ह्यात किमान 350 टेस्ट करायला हव्यात.

    नवी दिल्ली, 16 एप्रिल : देशभरात कोरोनाचं मोठं संकट आहे. या महासंकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढायला हवं, असं आवाहन राहुल गांधींनी केलं आहे. तसंच फक्त लक्षण दिसणाऱ्यांच्या चाचण्या करून उपयोग नाही तर आपल्याकडे टेस्टिंगची क्षमता वाढवणं गरजेचं आहे. हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांमध्ये सर्वांच्या टेस्ट करायला हव्यात असं मला वाटतं असं कोरोनाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस नेते राहुल गांधींनी सल्ला दिला आहे. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे एका जिल्ह्यात किमान 350 टेस्ट व्हाव्यात देशात कोरोनाचं खूप मोठं संकट लॉकडाऊन हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यावरचा उपाय नाही फक्त लॉकडाऊन करणं हा कोरोनावरचा उपाय नाही संकाटाच्या काळात एकत्र येणं गरजेचं टेस्टिंग क्षमता वाढवण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास भारताला मोठा फायदा होईल बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे गरिबांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची गरज आहे. याशिवाय गरजू लोकांपर्यंत अन्न पुरवठा व्हायला हवा. कोरोनामुळे देशात सध्या आणीबाणीसारखी स्थिती आहे. केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला ताकद देणं महत्त्वाचं आहे. हे युद्ध आता खऱ्या अर्थानं सुरू झालं आहे त्यामुळे आताच आपण विजय साजरा करून चालणार नाही. या संकटकाळात सर्व बाजूनं विचार करणं गरजेचं आहे. लॉकडाऊमुळे मजुरांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान आणि देशाला बसलेला आर्थिक फटका याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या महासंकटाविरोधात लढण्यासाठी विविध स्तरावर नियोजन करायला हवं. देशात टेस्टिंग किट्सची मोठ्या प्रमाणात कमकरता आहे. ही लढाई मोठी आहे त्यामुळे विचार करून लढणं गरजेचं आहे. त्यासाठी रँडम टेस्टींग करणं गरजेचं आहे. मजूर आणि गरिबांच्या खात्यात थेट पैसे द्या छोट्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन आणि बेरोजगारीचं संकट ओढवू नये यासाठी नियोजन मोदींजींच्या अनेक गोष्टी मला आवडत नाहीत मात्र आता भांडण्याची ही वेळ नाही. एकत्र येऊन महासंकटाविरोधात लढण्याची वेळ आहे घाबरण्याचं कारणं नाही पण एकत्र येऊन लढण्यात बळं आहे. आपण सहज कोरोनाला हरवू शकतो पण आपापसोत भांडत राहिलो तर कोरोनावर यश मिळवणं कठीण होईल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Congress, Coronavirus, PM narendra modi, Rahul gandi

    पुढील बातम्या