नवी दिल्ली, 28 मार्च : भारतात (India) 12 तासांत कोरोनाव्हायरचे (Coronavirus) तब्बल 74 रुग्ण आढळलेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 917 वर पोहोचली आहे. तर आणखी एकाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या आता एकूण 20 झाली आहे.
शनिवारी सकाळी 7 वाजता देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी 843 होती. आतापर्यंत ही आकडेवारी तब्बल 917 वर पोहोचली आहे. म्हणजे अवघ्या 12 तासात कोरोनाव्हायरसचे तब्बल 74 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनाव्हायरसच्या मृतांचाही आकडा वाढला आहे. हैदराबादमधील खैरताबादमधील एका 74 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील कोरोनाव्हायरमुळे मृत्यू झाल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे.
हे वाचा - कल्याण-डोंबिवली आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण, लग्न सोहळ्यात एकाला झाली लागण
भारतातील एकूण 917 रुग्णांपैकी 819 अॅक्टिव्ह केसेस आहेत, 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 79 रुग्ण बरे झालेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील हा आकडा आता 169 वर पोहोचला आहे.
Coronavirus च्या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund स्थापन करण्यात आला आहे. Covid-19 च्या लढाईसाठी बळ म्हणून ज्या नागरिकांना छोट्या -मोठ्या प्रमाणावर दान करायचं आहे त्यांनी PM Cares Fund ला आपलं योगदान द्यावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
हे वाचा - PM cares : कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी पंतप्रधान मोदींनी केलं नवं आवाहन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.