नवी दिल्ली, 20 मार्च : भारतात (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये एका महिलेचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला झाला आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 196 वर पोहोचली आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये 69 वर्षांची इटालियन पर्यटक महिला भारतात आली होती. तपासणीत तिला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं होतं. तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या आता 196 वर पोहोचली आहे. त्यापैकी 13 जणांवरील उपचार यशस्वी ठरलेत. हे 13 जण व्हायरसमुक्त झालेत.
देशात कोरोनाव्हायरचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली.
कोरोनासारख्या महामारीला जनतेनंच हरवायचं आहे यासाठी घराबाहेर न पडता काळजी घ्या आणि सतर्क रहा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. रविवारी 22 मार्चला कोणीही घराबाहेर पडू नका संचारबंदी लागू करण्यात येणार असून सगळ्यांनी त्यांचं पालन करावं असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे. पण या सगळ्यात कुठेही अन्यधान्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी ग्वाहीदेखील मोदींकडून देण्यात आली आहे.
हे वाचा - 22 मार्चला जनता कर्फ्यू : रविवारी नेमकं काय होणार? वाचा मोदींच्या भाषणातले 17 महत्त्वाचे मुद्दे