Home /News /national /

शाब्बास! कोरोनाच्या लढाईत भारतासाठी आनंदाची बातमी, 102 रुग्ण झाले निरोगी

शाब्बास! कोरोनाच्या लढाईत भारतासाठी आनंदाची बातमी, 102 रुग्ण झाले निरोगी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1,161वर पोहचली आहे. असे असले तरी आतापर्यंत 102 रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत.

    नवी दिल्ली, 30 मार्च : भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1,161 झाली आहे. तर आतापर्यंत 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या सगळ्यात भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 102 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं कोरोनाला हरवणे शक्य असल्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात 102 रुग्ण निरोगी झाल्यामुळं भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 19 रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत. सध्या केरळमध्ये 194 कोरोनारुग्ण आहेत. यात 49 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान राज्यात संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केरळमधील रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. वाचा-Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो? महाराष्ट्रात 25 रुग्ण झाले निरोगी सध्या सर्वात जास्त कोरोनारुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 215वर पोहोचली आहे. रविवारी सकाळी 12 नवीन रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. मात्र आता 25 रुग्ण निरोगी असल्याची माहिती आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांना आकडा 200हून अधिक झाला आहे. तर, मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे. वाचा-कोरोनामुळे जनता संकटात, अन् राजा 24 महिलांना घेऊन झाला फरार इतर राज्यांमध्येही कोरोनाच्या रुग्णांना डिस्चार्ज केरळ, महाराष्ट्रासोबतच हरियाणा, गुजरात उत्तर प्रदेशातील रुग्णही निरोगी झाले आहेत. हरियाणातील 17, उत्तर प्रदेशातील 11 तर गुजरात दोघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. भारतात सध्या 21 दिवसांला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. वाचा-'भारताला 21 नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो', तज्ज्ञांचा इशारा लॉकडाऊनचा कालावधी वाढणार? 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. असे असले तरी, भारतील परिस्थिती सुधारण्यासाठी 21 दिवसांचा नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन असावा असे केंब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्या संशोधकांनी एका संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे लोकडाऊनचा कालावधी वाढण्याची चिन्हे आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या