50 घरांमध्ये दूध विकणाराच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, हजारो लोकांचे जीव धोक्यात

हरियाणामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 211 आहे तर 72 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हरियाणामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 211 आहे तर 72 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • Share this:
    फरिदाबाद, 18 एप्रिल : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असलं तरीही अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेतील एक दूध. या दूधवाल्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं हरियाणातील फरिदाबादमध्ये मोठी खळबऴ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा दूधवाला फरिदाबादमध्ये दूध विकायचा याशिवाय कारना गावातील 50 घरांमध्ये दूध विकण्यासाठी जात होता. याशिवाय आर्थिक व्यवहार आणि दूध विक्री-देवाणघेवणार हे व्यवहार वेगळेच. अनेक लोकांच्या दररोज संपर्कात येणारा हा दूधवालाच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं आता मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे हजारो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यापैकी दूधवाल्याच्या संपर्कात आलेल्यांपैकी 17 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे वाचा-कोरोनामुळे ही मोठी कंपनी 2025पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात हरियाणामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 211 आहे तर 72 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आता दूधवाला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत 14 हजारवर पोहोचली आहे. त्यामध्ये 9 महिन्यांचा चिमुकलाही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 14, 378 एकूण आकडा झाला आहे. आतापर्यंत 480 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 991 रुग्णांना या व्हायरसवर यशस्वी मात दिली आहे. हे वाचा-कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच पुण्यासह देशभरातून आली आनंदाची बातमी संपादन- क्रांती कानेटकर
    First published: