Home /News /national /

दिवाळी आणि थंडीची चाहूल लागताच राजधानीत कोरोनाचा विस्फोट, मृत्यूच्या आकडेवारीनं मोडला रेकॉर्ड

दिवाळी आणि थंडीची चाहूल लागताच राजधानीत कोरोनाचा विस्फोट, मृत्यूच्या आकडेवारीनं मोडला रेकॉर्ड

ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याचा दर 11.71 आहे. बुधवारी सर्वाधिक म्हणजेच 8,593 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : दिवाळी आणि थंडीची चाहूल लागली आहे. या सणासुदीत देशातील कोरोनाच्या आकडेवारीत घट होत असली तरी राजधानी दिल्लीत मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोना जीवघेणा होत चालला आहे. वाढणारं प्रदूषण आणि कोरोनामुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात दरदिवसाला 65 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. गुरुवारी नवीन कोरोनाचे रुग्ण वाढण्याची संख्या कमी झाली मात्र सर्वाधिक रुग्णांचा म्हणजेच 104 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 7 हजार 53 नवीन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल अशी चिंता व्यक्त होत असतानाच आता मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढल्यानं काहीशी भीती देखील नागरिकांच्या मनात आहे. दिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऐन दिवाळी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी फटाक्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. हे वाचा-कडक सॅल्युट ! कोरोनामुळे पायलटची नोकरी गेली;स्वत:च्या गणवेशात विकतोय नूडल्स राजधानीत कोरोनाचे एकूण 4,16,580 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण 7332 लोक मरण पावले आहेत. दिल्लीत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 43,116 वर पोहोचला आहे. तर 24 तासांत 6462 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याचा दर 11.71 आहे. बुधवारी सर्वाधिक म्हणजेच 8,593 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात काय आहे कोरोनाची स्थिती? कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने विक्रम केला आहे. राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही 16,05,064 एवढी झाली आहे. गुरूवारी दिवसभरात 7,809 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 4,496 नवीन रुग्ण आढळून आलेत. 122 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या ही 17,36,329 वर गेली आहे. Recovery rate हा 2.63वर गेला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या