मंगळसूत्राहून मौल्यवान आहे मास्क, तुफान VIRAL होतोय विवाहित जोडप्याचा PHOTO

मंगळसूत्राहून मौल्यवान आहे मास्क, तुफान VIRAL होतोय विवाहित जोडप्याचा PHOTO

सात फेरे घेण्याआधी नवरदेवानं पत्नीला घातला मास्क, पाहा PHOTO

  • Share this:

रायपूर, 29 एप्रिल : देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. ह्या संसर्गाचा मोठा फटका लग्नसमारंभांना बसला आहे. अनेक लग्न सोहळे रद्द करण्यात आले तर काहींनी पुढे ढकलले. पण या लॉकडाऊनमध्येही सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून लग्न केलं आहे. कुठे दुचाकीवर बसवून तर कुठे मंदिराच्या बाहेर असे लग्न केलं जात असतानाच सोशल मीडियावर लग्न करताना जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लग्नात मंगळसूत्र गळ्यात घालणं आणि सप्तपदी हा विधी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. मात्र या जोडप्यानं मंगळसूत्र घालण्याआधी आपल्या होणाऱ्या पत्नीच्या तोंडाला प्रेमानं मास्क लावला आहे. त्यानंतर दोघांनी मिळून 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन घेतलं.

हे वाचा-...आणि पुण्यात अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला!

छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता सिंह देव यांनी तिच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे लग्न केल्याचा हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या दोघांचंही खूप कौतुक केलं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लग्नात नवरदेवानं होणाऱ्या पत्नीला आधी मास्क आणि नंतर मंगळसूत्र घातल्यानं त्याचं कौतुक होत आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बिलासपूरमध्ये लॉकडाऊनदरम्यान हे लग्न पार पडलं या लग्नचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-दारूची दुकाने बंद का? एम्सच्या डॉक्टरांनी काय सांगितलंय, ते एकदा वाचाच!

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 29, 2020, 10:32 AM IST

ताज्या बातम्या