Home /News /national /

क्वारंटाइन सेंटरमधून निघाला 8 फूट लांब विषारी साप, पुढे काय झालं वाचा

क्वारंटाइन सेंटरमधून निघाला 8 फूट लांब विषारी साप, पुढे काय झालं वाचा

बिहारमधील गोपालगंज इथल्या एका क्वारंटाइन सेंटरमधून चक्क 8 फूट लांब विषारी साप बाहेर आला आहे.

    गोपालगंज, 24 मे : देशभरात कोरोनाची लक्षण असणाऱ्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाते. या क्वारंटाइन सेंटरमधील दुरावस्था दाखवणारे अनेक फोटो समोर आले आहेत. देशात काही ठिकाणी दुरावस्था आहे तर काही ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव. बिहारमधील गोपालगंज इथल्या एका क्वारंटाइन सेंटरमधून चक्क 8 फूट लांब विषारी साप बाहेर आला आहे. याआधीही सापानं दंश केल्यानं मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असताना गोपालगंज इथल्या क्वारंटाइन सेंटरमधून ही धक्कादायक बाब समोर आली. कोरोनासोबत अशाप्रकारच्या निघणाऱ्या सापांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. हा करैत प्रजातीचा सर्वात विषारी साप असल्याचं सांगितलं जात आहे. हथुआ इथले माध्यमिक शाळाते 17 जणांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे सर्व लोक अहमदाबाद, जम्मू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथून आले आहेत. रविवारी पहाटे एक तरुण आपला मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी खोलीच्या भिंतीच्या दिशेने गेला, तेव्हाच त्याला भिंतीजवळ काहीतरी हलल्यासारखं दिसलं. त्यानं नीट पाहिल्यानंतर हा विषारी साप दिसला आणि तरुणाची बोबडी वळली. साप दिसल्यानं सगळ्यांना उठवलं. काही काळासाठी या केंद्रात गोंधळ उडाला आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर या सगळ्यांना सापाला ठार मारण्यात यश आलं. हे वाचा-Maharashtra Breaking: राज्यात गेल्या 24 तासांत 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह हे वाचा-ऑटो, टॅक्सीवर बंदी; तर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील? या प्रकरणी क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या मजुरांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार झोपायला अंथरूणसुद्धा नाही. लोकांना त्यांच्या स्वत: च्या घरातून अंथरुण आणावं लागेल आणि सध्या ते जमिनीवरच झोपत आहेत. याशिवाय इथे साप, विषारी किडे सातत्यानं येतात अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला जात आहे. आश्वासना पलिकेड पदरात केवळ निराशा आल्यानं इथल्या लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हे वाचा-GROUND REPORT : 'बंबई से गई पूना, पूना से गई पटना', तरीही घर येईना! हे वाचा-प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मावशीचा कोरोनामुळे मृत्यू, अंतिम दर्शनही घेणं झालं अशक्य संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या