Home /News /national /

बापरे! बंगळुरूत असे झाले 3 हजारहून अधिक कोरोना रुग्ण गायब, अख्खं राज्य हादरलं

बापरे! बंगळुरूत असे झाले 3 हजारहून अधिक कोरोना रुग्ण गायब, अख्खं राज्य हादरलं

गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत.

कर्नाटकातील कोरोनाबाधितांची संख्या 90 हजार पार झाली आहे. यासगळ्यात राज्याची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    बंगळुरू, 26 जुलै : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले, तर 705 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्खा 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यात कर्नाटक राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 90 हजार पार झाली आहे. यासगळ्यात राज्याची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूमधून तब्बल 3 हजार 338 कोरोना रुग्ण गायब झाले आहे. हे रुग्ण कुठे गेले, याबाबत कोणालाच माहिती नाही आहे. सध्या प्रशासन, बेपत्ता झालेल्या या 3 हजार 338 रुग्णांचा शोध घेत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे रुग्णांना ट्रॅक करण्याचे कोणतेही साधन नाही आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या सर्व रुग्णांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे की नाही? याबाबतही प्रशासनाला कोणतीही माहिती नाही आहे. वाचा-फक्त तीन दिवसांत देशात सापडले दीड लाख रुग्ण, 24 तासांतील चिंताजनक आकडेवारी बंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त एन मंजुनाथ प्रसार यांनी सांगितले की, "कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी आम्ही पोलिसांची मदत घेतली आहे. मात्र बेपत्ता झालेले 3 हजार 338 रुग्णांना शोधणं कठिण आहेत. काही रुग्णांनी फोन नंबर आणि पत्ते चुकीचे दिले आहे. कोरोना झाल्याचे भीतीने किंवा क्वारंटाइन होण्याच्या भीतीने हे लोकं बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे". एकूण कर्नाटक राज्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण बंगळुरूत आहेत. वाचा-कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकंट, तब्बल 640 लोकांना झाली विचित्र आजाराची लागण आता कोरोना चाचणीआधी सरकारने ठेवली ही अट कोरोना रुग्ण गायब झाल्यानंतर आता रुग्णांची तपासणी करण्याआधी सरकारने एक अट ठेवली आहे. रुग्णांकडून सर्व माहिती घेतल्यानंतर, ती बरोबर आहे की नाही हे तपासले जाणार आहे. उप मुख्यमंत्री डॉ.अश्वत नारायण यांनी सांगितले की, 'आम्ही लवकरच या रुग्णांचा शोध घेऊ. वाचा-44 जणांनी कोरोनाला हरवलं जोमात, झिंगाट गाण्यावर तुफान डान्सचा VIDEO बंगळुरूमध्ये कोरोनाचा हाहाकार! गेल्या दोन आठवड्यात बंगळुरूत कोरोनाचे 16 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. यासह शहरातील रुग्णांची संख्या 27 हजार झाली आहे. कर्नाटकात गेल्या 24 तासांत 5072 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, राज्यात 90 हजार 942 रुग्ण आहेत. तर, 1796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या