इंदूर, 19 एप्रिल : कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर्स, आरोग्य सेवा, परिचारिका आणि त्यांच्यासोबत पोलीसही अहोरात्र ड्युटी करत आहेत. याच अत्यावश्यक सेवेत असलेल्यांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. 24 तासांत कोरोनामुळे दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे उत्तर प्रदेशातील इंदूर इथे 48 वर्षीय टीआयई देवेंद्र चंद्रवंशी यांचा मृत्यू झाला आहे. ते इंदूर इथे जुनी पोलीस स्थानकात कार्यरत होते.
देवेंद्र यांच्यावर कोरोनासोबतच न्यूमोनियाचे उपचार सुरू होते. 15 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अधिक खालावत होती. शनिवारी रात्री उशीरा त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी नवीन 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण इंदूरमध्ये आढळले आहेत. इंदूरमध्ये आतापर्यंत 890 जणांना कोरोनाची लागण झाली असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचा-लेकरासाठी आई कोरोनाशी लढली, 22 दिवसांच्या मरणयातनेनंतर दिला गोड बाळाला जन्म
कोरोना व्हायरसमुळे पंजाबमध्ये ACPचा उपचारादरम्यान मृत्यू
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आरोग्य सेवा, पोलीस अधिकारी रात्रंदिवस आपली ड्युटी करत आहेत. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे पंजाबमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) अनिल कोहली यांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील रुग्णालयात कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे. 52 वर्षांच्या कोहली यांना 8 एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
हे वाचा-दिल्ली हादरली! एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण, परिसरात खळबळ
संपादन- क्रांती कानेटकर