भुवनेश्वर, 18 मार्च : भारतासह जगातील अनेक देश हे कोरोनासारख्या (Coronavirus)आजाराशी लढत आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 147 प्रकरणं समोर आली आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक डॉक्टर्स आणि अनेक सरकारी कर्मचारी रुग्णांची मदत करत आहेत. अशाच एक रिअल हिरोची कहानी समोर आली आहे. आपल्या घरातील कठीण परिस्थिती बाजूला ठेवून लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे. भुवनेश्वरमध्ये तैनात आयएएस अधिकारी निकुंज धल (Nikunja Dhal) असं या रिअल हिरोचं नाव आहे.
सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हीरोला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. सगळ्या प्रसंगाला तो न घाबरता सामोरं जातो. आयएएस अधिकारी निकुंज धूम असेच रिअल हीरो आहेत. नुकत्याच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, परंतु निकुंज अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 24 तासांच्या आत त्यांच्या ड्युटीवर लागू झाले.
निकुंज धलच्या वेळेस आरोग्य आणि कौटुंबिक संस्कृती विभागात सेक्रेटरी पदावर काम करतात. वडिलांच्या मृत्यूमुळे दुसऱ्या दिवशी ड्युटी ज्वॉइन करायची होती, त्यातून कोरोना व्हायरसने घेतलेल्या लोकांची मदत करायची होती. निकुंज यांच्या या कामगिरीमुळे त्यांचं सर्वस्थरातून कौतूक होत आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा सगळ्यांसाठी एक आदर्शाची बाब आहे.
ओडिशामध्ये कोरोना विषाणूचा एक रुग्ण आहे. भुवनेश्वरमधील अधिकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित व्यक्ती इटलीहून आल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णाने 33 दिवस प्रवास केला होता. मार्चमध्ये इटलीतून दिल्लीला आला आणि 12 मार्च रोजी ट्रेनने भुवनेश्वरला आला. कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये राज्य सरकारचे प्रमुख प्रभात सुब्रतो बागची म्हणाले की रुग्णाला भुवनेश्वर स्थित कॅपिटल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्य सरकारने सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले की कोविड 19 पासून आतापर्यंत 1,81,584 लोक प्रभावित झाले आहेत. राज्यात अशा प्रकारच्या घटनांची संख्या वाढू नये, म्हणून आधीपासूनच तयारी करायला हवी.