मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॉकडाऊनमध्ये सरकारचं किती कोटींचं नुकसान झालं? अहवालातून समोर आला आकडा

लॉकडाऊनमध्ये सरकारचं किती कोटींचं नुकसान झालं? अहवालातून समोर आला आकडा

देशव्यापी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह केंद्र व राज्य सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह केंद्र व राज्य सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह केंद्र व राज्य सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

नवी दिल्ली, 14 मे : देशव्यापी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह केंद्र व राज्य सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एप्रिलमध्ये 21 प्रमुख राज्यांचे संयुक्तपणे 97 हजार 100 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. इंडिया रेटिंग्सच्या बुधवारीच्या अहवालानुसार विमान चालन, पर्यटन, हॉटेल आणि आतिथ्य क्षेत्रातील उत्पादन, पुरवठा-साखळी, व्यवसाय आणि इतर कामकाज ठप्प आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांमध्येही रोखीसाठी संघर्ष होत आहे. राज्यांमध्ये समस्या अधिक आहेत. कारण त्यांना कोविड-19 या साथीच्या रोगाच्या खर्चाशी दोन हात करावे लागत आहे. एप्रिलमध्ये राज्यांना जीएसटीमधून 26 हजार 992 कोटी, व्हॅटमधून 17 हजार 895 कोटी, अबकारी शुल्कातून 13 हजार 785 कोटी, मुद्रांक व नोंदणी शुल्कामधून 11 हजार 397 कोटी, वाहन करातून 6 हजार 55 कोटी, कर व वीज करावरील 3 हजार 464 कोटी प्राप्त होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ही कमाई होऊ शकली नाही. पुढील आठवड्यात लॉकडाऊन संपले तरीही दुसर्‍या तिमाहीपर्यंत आर्थिक क्रियाकलाप सामान्य राहणार नाहीत. लॉकडाऊनचा गुजरात सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान झालेली राज्ये अशी आहेत की ज्यांचा एकूण उत्पन्नात त्यांच्या स्त्रोतांकडून महसूलाचा जास्त वाटा आहे. गोवा, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा यांना स्वतःच्या स्त्रोतांकडून 65-76 टक्के उत्पन्न मिळते. गुजरात 76 टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. हेही वाचा - भारतात कोरोनाची स्थिती कशी राहणार? या संस्थेने वर्तवला सरकारची झोप उडवणारा अंदाज तेलंगणातील 75.6 टक्के, हरियाणामधील 74.7 टक्के, कर्नाटकमधील 71.4 टक्के, तामिळनाडूतील 70.4 टक्के, महाराष्ट्रातील 69.8 टक्के, केरळमधील 69.6 टक्के महसूल हा त्याच्या स्रोतातून होत असतो. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या