Home /News /national /

देशात कोरोनाची भयानक परिस्थिती, 24 तासांतील रुग्णसंख्येची आकडेवारी धक्कादायक

देशात कोरोनाची भयानक परिस्थिती, 24 तासांतील रुग्णसंख्येची आकडेवारी धक्कादायक

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

8,17,209 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 24 जुलै: कोरोनाचा संसर्ग देशात वेगानं वाढत आहे. रोज कोरोनाच्या नवीन रुग्णांची रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल 50 हजार नवीन केसेस समोर आले आहेत. गुरुवारी 45 हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद केल्यानंतर ही आकडेवारी आणखीन धक्कादायक असल्याचं समोर येत आहे. तीन दिवसांत जवळपास 1 लाख जाणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दोन दिवसांवर येतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागच्या 24 तासांत 49 हजार 310 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 740 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा 30 हजार 601 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 12,87,945 लाखवर पोहोचली आहे. हे वाचा-बापरे! या राज्यात मास्क न लावल्यास 1 लाखांचा दंड आणि 2 वर्षांचा तुरुंगवास देशात 23 जुलै रोजी 3,52,801 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 49 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशात 4,40,135 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर 8,17,209 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या कोरोनाची लस येण्याची सर्वचजण वाट पाहात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 12 ते 15 दिवसांत कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी लागणारा वेग आता 3 ते 2 दिवसांवर आला आहे. गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रिकव्हरी रेट चांगला असला तरीही संसर्ग होण्याचा वेग आणि धोका कमी झालेला नाही. कोरोनाची लस आल्यानं किमान हा वेग कमी होईल अशी आशा आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या