मराठी बातम्या /बातम्या /देश /

'हॅलो...माझ्या घरात पोहचला कोरोना, आता काय करू सांगा?'

'हॅलो...माझ्या घरात पोहचला कोरोना, आता काय करू सांगा?'

कोरोनामुळे सध्या जगातील सर्व देश हैराण झाले असताना सरकारच्या हेल्पलाईनवर जवळजवळ 35 हजार फोन येत आहेत.

कोरोनामुळे सध्या जगातील सर्व देश हैराण झाले असताना सरकारच्या हेल्पलाईनवर जवळजवळ 35 हजार फोन येत आहेत.

कोरोनामुळे सध्या जगातील सर्व देश हैराण झाले असताना सरकारच्या हेल्पलाईनवर जवळजवळ 35 हजार फोन येत आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 16 मार्च : कोरोनामुळे सध्या जगातील सर्व देश हैराण झाले आहेत. लोकांमध्यही भीतीचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाच्या वतीने एक नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर दररोज, नमस्कार... मी कर्नाटकातून बोलत आहे. कोरोना माझ्या शेजारपर्यंत पोहचला आहे. माझ्या आईला आणि बायकोला ताप आहे, मी काय करू? मी आता उपचारासाठी कुठे जाऊ? कोरोना विषाणूबद्दलचे असे प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हेल्पलाइनवर विचारले जात आहेत. कोरोना विषाणूमुळे प्रत्येकजण चिंताग्रस्त आहे, मात्र आरोग्य विभागाच्या वतीने 12-12 तासांच्या शिफ्टमध्ये लोकांच्या मदतीसाठी कर्मचारी तैणात आहेत.

नवी दिल्लीतील काश्मिरी गेटजवळील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे (NCDC) देशातील कानाकोपऱ्यात मदत पोहचवली जात आहे. कर्मचारी हेल्पलाईन नंबर 011-23978046 वर येणाऱ्या फोनसह ई-मेलद्वारेही लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही देत आहेत. दररोज 200-250 मधून येणारे कॉल आता 1500 वर पोहचले आहेत. हे कॉल रेकॉर्ड दररोज, प्रत्येक क्षणी वाढत आहेत.

वाचा-OMG! हॉलिवूड कलाकारही कोरोनाच्या रडारवर, जेम्स बाँडमधील अभिनेत्रीला झाली लागण

आतापर्यंत 35 हजाराहून अधिक फोन कॉल आणि सुमारे 30 हजार ई-मेल NCDCला आले आहेत. चोवीस तास सुरू असलेल्या या हेल्पलाईनवर केवळ विविध राज्यांतूनच नाही तर, परदेशात वास्तव्य करणारे भारतीय नागरिकदेखील फोन करत आहेत. लोकांना हेल्पलाइनद्वारे कोरोनाची लक्षणे कोणती आहेत? संरक्षण म्हणजे काय? आम्ही कोणती खबरदारी घ्यावी? फिरायला गेल्यास काय सावधगिरी बाळगली पाहिजे? या संबंधी सर्व माहिती दिली जात आहे.

वाचा-VIDEO : कोरो'ना' रोमान्स, भीतीपोटी प्रसिद्ध सुपरमॉडेलनं असं केलं नवऱ्याला Kiss

प्रत्येक फोनला दिले जात आहे उत्तर

केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही लोकांचे फोन येत आहेत. आतापर्यंत परदेशात अडकलेल्या भारतीयांकडून 1100 हून अधिक फोन आले आहेत. फोनचा तपशील कर्मचाऱ्यांकडून रजिस्टरमध्ये नोंदवला जातो.

वाचा-पुण्यात पहिला गुन्हा दाखल, कोरोनाची अफवा पसरवणं पडलं महागात

3 मिनिटांत ई-मेलला मिळणार उत्तर

30 फोन लाइन व्यतिरिक्त ईमेलद्वारेही लोकं आपले प्रश्न मांडत आहेत. NCDCच्या वतीने ईमेलला फक्त दोन ते तीन मिनिटांत उत्तर दिले जात आहे. बहुतेक ईमेल परदेशातील नागरिकांकडून येत आहे. मंत्रालय 24 तास काम करीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india