नवी दिल्ली, 19 एप्रिल : कोरोनाचा प्रादूर्भाव थांबण्याचं नावच घेत नाही. दिवसेंदिवस हा संसर्ग वेगानं वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका दिवसात तब्बल 2 हजार लोकांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. ICMR कडून मिळालेल्या माहितीनुसार एका दिवसात 2 हजार 154 नवीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजार 365 वर पोहोचला आहे.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत 3,54,969 लोकांच्या 3,72, 123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 16, 365 नमुन्यांचचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Total sample tested 3,72,123. Total individuals tested 3,54,969. Samples tested today 35,494: Indian Council of Medical Research (ICMR) #Coronaviruspic.twitter.com/44zoXG32mF
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 488 वर पोहोचली, तर आतापर्यंत एकूण 14,792 लोकांना संसर्ग झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून 36 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 957 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2,014 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात कोरोना साथीच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे 3.3% आहे. वयोगटाद्वारे विश्लेषण केल्यास 0-45 वर्षे वयोगटातील 14.4% मृत्यूदर आहे. 45-60 वर्षांच्या दरम्यानचं प्रणाण 10.3 तर 60 ते 75 वर्ष वयोगटादरम्यान ही आकडेवारी 33.1 टक्के आहे.
कोरोनामुळे एका दिवसात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेश-12, गुजरात-10, महाराष्ट्र-7, दिल्ली-4, आंध्रप्रदेश, बिहार आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर आतापर्यंत देशात 488 रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त बळी महाराष्ट्रात 201, मध्य प्रदेश-69, गुजरात-48, दिल्ली-42 आणि तेलंगणा-18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.