भारतात गेल्या 11 दिवसांत कोरोनाचा कहर, तरीही देशासाठी दिलासादायक बातमी

भारतात गेल्या 11 दिवसांत कोरोनाचा कहर, तरीही देशासाठी दिलासादायक बातमी

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून 101 दिवसात यामुळे 2 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. यात गेल्या 11 दिवसांतच 1 हजार जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या आठवड्याभरात भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास 20 हजारांनी वाढली आहे. मृत्यूचं प्रमाण एप्रिल महिन्यापेक्षा मे मध्ये जास्त आहे. भारतात आतापर्यंत 2 हजार लोकांचा मृत्यू झाला. 11 मार्चला देशात कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुढच्या 59 दिवसांमध्ये देशात 2 हजार जणांचा मृत्यू झाला.  मात्र तरीही हे प्रमाण जगात कोरोनाचा दणका बसलेल्या देशांच्या तुलनेत भारताला दिलासा देणारे आहे.

जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदर ब्रिटन आणि स्पेनमध्ये आहे. तिथं फक्त 23 दिवसांत दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होईल. तर बेल्जियममध्ये 27 दिवसांत आणि स्वीडनमध्ये 43 दिवसांत कोरोनामुळे 2 हजार लोकांचा मृत्यू झाला.

दोन हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेल्या ब्राझील, तुर्की आणि मेक्सिको देशांपेक्षा भारताची स्थिती दिलासादायक आहे. ब्राझीलमध्ये 15 मार्चला पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर पुढच्या 33 दिवसात 2141 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ब्राझीलमध्ये 1 लाख 41 हजार 88 रुग्ण आढळले आहेत. यातील 9 हजार 637 म्हणजेच 15 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला.

तुर्कीत 17 मार्चला कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुढच्या 33 दिवसात 2017 लोकांचा मृत्यू झाला. आता देसात 1 लाख 35 हजार 569 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील 3 हजार 689 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा सर्वात कमी मृत्यू दर आहे.

मेक्सिकोमध्येही ब्राझीलसारखीच परिस्थिती आहे. 20 मार्चला पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या 44 दिवसांत या ठिकाणी रुग्णांची संख्या 2061 इतकी झाली. तर आतापर्यंत 29616 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 2961 लोकांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण 14 टक्के इतकं आहे.

हे वाचा : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20000 पार; दिवसभरात 48 मृत्यू

भारतात गेल्या 11 दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला. त्यानंतर 90 दिवसात म्हणजेच 28 एप्रिल पर्यंत देशात 1004 लोकांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पुढच्या फक्त 11 दिवसात हा आकडा 2 हजारांवर पोहोचला. 29 एप्रिल ते 9 मे या काळात 1 हजार 3 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 2007 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा : ठाकरे सरकारने ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्यावा, चंद्रकांत पाटलांची मागणी

लोकसंखेच्या दृष्टीने भारतात होणारा कोरोनाचा प्रसार हा इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. अमेरिका, फ्रान्स, स्पेन, इटली या देशांपेक्षा कमी वेगानं भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.

हे वाचा : अरे देवा! भविष्यात आणखी एक संकट, पुन्हा घरात व्हावं लागणार बंदिस्त

First published: May 9, 2020, 10:33 PM IST

ताज्या बातम्या