Coronavirus : लॉकडाऊनमुळे मिळाली नाही दारू म्हणून 5 जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू

विरोधी पक्षांच्या दबावामुळे केरळमध्ये सरकारला दारूच्या दुकानांनाही बंद करावं लागलं. संपूर्ण राज्यातील दारूची दुकानं बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे असंही म्हटलं जात आहे.

विरोधी पक्षांच्या दबावामुळे केरळमध्ये सरकारला दारूच्या दुकानांनाही बंद करावं लागलं. संपूर्ण राज्यातील दारूची दुकानं बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे असंही म्हटलं जात आहे.

  • Share this:
    तिरुअनंतपुरम, 29 मार्च : देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. देशभरात जीवनावश्यक वस्तू वगळता आणि आरोग्य सेवा वगळता सर्व 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. लॉकडाऊनमुळे केरळमधील वाईनची सगळी दुकानं बंद आहेत. दारूची तलफ येऊन दारू न मिळाल्यानं 5 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चारही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. लॉकडाऊनमुळे कुठेच दारू न मिळाल्यानं या पाचही जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नशामुक्तीकेंद्र आणि रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. कोरोनानंतर या गोष्टीचा धोका वाढत आहे. त्यामुळे केरळ सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे. हे वाचा-देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, आतापर्यंतचा आकडा 193 वर केरळमध्ये देशभरात लॉकडाऊनची घोषणा होण्याआधी अत्यावश्यक श्रेणीमध्ये दारू असल्याचं गृहित धरून दारूची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षांच्या दबावामुळे केरळमध्ये सरकारला दारूच्या दुकानांनाही बंद करावं लागलं. संपूर्ण राज्यातील दारूची दुकानं बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे असंही म्हटलं जात आहे. महाराष्ट्रानंतर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारवर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अहमदाबाद इथे 45 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमधील कोरोनाग्रस्ताचा हा पाचवा मृत्यू आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा महाराष्ट्रील वाढता धोका लक्षात घेता सरकार आणि पोलिसांकडून घरी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे वाचा-Lockdown मध्ये एकमेकांना वेळ देत आहेत रणबीर-आलिया, VIDEO व्हायरल
    First published: