कोरोना नाही तरी अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन

कोरोना नाही तरी अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन

कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेह दफन करण्यासाठी गावात जागा मिळाला नाही. एवढचं काय त्याला खांदा द्यायला कुटुंबातले लोकही पुढे आले नाहीत.

  • Share this:

दंतेवाडा, 09 एप्रिल : देशात कोरोनामुळे इतकी दहशत पसरली आहे की लोकांना साधी सर्दी, खोकला झाला तरी घाबरगुंडी उडते. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. यातच एकाचा मृत्यू झाला त्यानंतर मृतदेहावर व्यवस्थित अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. छत्तीसगढमधल्या दंतेवाढा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. कटेकल्याण भागातील गुडसे गावात एका तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे त्याला दफन करण्यासाठी गावात जागा मिळाला नाही. एवढचं काय त्याला खांदा द्यायला कुटुंबातले लोकही पुढे आले नाहीत.

अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्यानं त्याचा दफनविधी नाल्यात करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाला कोरोना झाला नव्हता अशीही माहिती मिळत आहे. रोजगार करणाऱ्या लखमा नावाच्या 22 वर्षीय तरुणाचा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यावेळी गावातील लोकांना त्याला कोरोना झाल्याचा संशय आला. तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार आंध्रप्रदेशातच करा असं गावकऱ्यांनी सांगितलं. लखमा जिथं काम करत होता त्या व्यक्तीनं मृतदेह त्याच्या मूळ गावी पाठवला होता.

हे वाचा : कोरोनाचा विळखा : 24 तासांमध्ये तब्बल 549 नवे रुग्ण, तर 17 जणांचा मृत्यू

गावकरी चिडू नयेत यासाठी मृतदेह दफन करण्याची तयारी दोघांनी केली. लखमाचा मृतदेह गडबडीतच एका झालाखाली दफन केला. ज्याच्या जमिनीत दफन केला त्यानं वाद केल्यानंतर पुन्हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शेवटी गावाबाहेर असेलल्या नाल्यात खड्डा खोदून मृतदेह दफन करण्यात आला.  लखमाच्या कुटुंबियांना त्याचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. त्याचा मोठा भाऊ म्हणाला की आई वडिलांना त्याच्यावर अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. आमच्यासारखं कमनिशिबी कोणी नसेल.

हे वाचा : 'हाताच्या कोपरावर मारा कोरोना जाईल', चिनी डॉक्टरांच्या उपचार पद्धतीबद्दल खुलासा

कटेकल्याणच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक गावी गेलं होतं. मृत तरुणाला सर्दी, खोकला यासारखी कोणती लक्षणे नव्हती. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला नव्हता. मात्र गावकऱ्यांना शंका असल्यानं गावात सध्या डॉक्टर नजर ठेवून आहेत. सध्याच्या परिस्थितीत धोका पत्करता येणार नाही असंही डॉक्टर म्हणाले.

हे वाचा : Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का

First published: April 9, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या