Coronavirus: 'फॉल्स निगेटिव्ह'ने वाढवली सरकारची चिंता, भारतासाठी धोक्याची घंटा

Coronavirus: 'फॉल्स निगेटिव्ह'ने वाढवली सरकारची चिंता, भारतासाठी धोक्याची घंटा

सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे 'फॉल्स निगेटिव्ह' रुग्णांचे. अशा रूग्णांकडून संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : देशात कोरोनाव्हायरसचा प्रसार होत असल्याने सरकारच्या चिंता वाढत आहेत. सध्या भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, हा कालावधी आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे 'फॉल्स निगेटिव्ह' रुग्णांचे.

फॉल्स निगेटिव्ह म्हणजे कोरोनाची तपासणी केल्यानंतर रुग्णात कोणतीही लक्षणे दिसत नाही. मात्र काही दिवसानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. अशा रूग्णांकडून संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही गंभीर बाब आहे, अशा रुग्णांबाबत आपण अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

आतापर्यंत केरळमध्ये अशी दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात रुग्णांत प्रथम कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, परंतु नंतर त्या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आरोग्य कर्मचारी संसर्ग कसा पसरणार नाही याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे सांगितले.

वाचा-मित्राच्या अंत्यविधीला गेला, अन् काही दिवसांतच संपूर्ण देशात पसरला कोरोना

केरळमध्ये सापडले फॉल्स निगेटिव्ह रुग्ण

केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात, तिरुवनंतपुरमपासून सुमारे 100 किमी अंतरावर, दोन रुग्ण फॉल्स निगेटिव्ह होते. दोघांमध्येही कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. जेव्हा त्यांची चाचणी करण्यात आली तेव्हा दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, यातील एक दुबईवरून आला होता. तर दुसरी व्यक्ती दिल्लीहून आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वी दोघांना कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षणे दाखविली नव्हती.

वाचा-हॉटस्पॉट भागात राहणारे लोक काय करू शकतात आणि काय नाही? जाणून घ्या सर्व माहिती

कोरोनाच्या लक्षणांमध्ये होत आहे वाढ

कोरोनाव्हायरसची (coronavirus) लक्षणं दिसण्याचा कालावधी हा 14 दिवसांचा आहे. मात्र हा कालावधी आता 20 दिवसांपर्यंत गेला आहे. यात सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं कोरोनाव्हायरसची आहेत. मात्र या लक्षणांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना अशी लक्षणं दिसल्यानंतर घरातच सर्वांपासून वेगळं राहणे जास्त गरजेचे आहे.

वाचा-वरळीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हालचाली, क्वारन्टाइनसाठी मोठी व्यवस्था

First published: April 9, 2020, 12:13 PM IST

ताज्या बातम्या