मातीमोल झाल्या तेलाच्या किंमती, आता रद्दीच्या भावात मिळणार पेट्रोल आणि डिझेल?

मातीमोल झाल्या तेलाच्या किंमती, आता रद्दीच्या भावात मिळणार पेट्रोल आणि डिझेल?

भारत हा आशियातला तिसरा मोठा तेल खरेदी करणारा देश आहे. सध्या 21 दिवसांचा लॉकडाउन असल्याने तेलाची मागणी एकदम घटली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 मार्च :  कोरोनामुळे सगळ्या जगाची गतीच मंदावली आहे. अनेक बडे देश लॉकडाउन आहेत. सगळे व्यवहार ठप्प आहेत. जगाचं आर्थिक केंद्र समजलं जाणारं न्यूयॉर्क बंद आहे. सगळे शेअरबाजार पडले आहेत. जगाचं अर्थकारण ज्या तेलावर चालतं त्यांच्या किंमतीतही ऐतिहासिक घसरण झाली आहे. देशच लॉकडाउन असल्याने गाड्या आणि अनेक उद्योग बंद आहे. त्यामुळे पेट्रोलची मागणी एकदम घटली आहे. कच्च्या तेलाला मागणीच नसल्याने त्याचे भाव निच्चांकी पातळीवर आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून ही घसरण सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीला एका बॅरलची  किंमत 80 डॉलर एवढी होती तीन नंतर 65, 50 आणि सध्या 30 डॉलरच्याही खाली आली असून अशीच परिस्थिती राहिली तर ती 10 डॉलरच्याही खाली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सौदीअरेबिया आणि इतर काही देशांची अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून आहे. तर जगाचं अर्थकारणही त्यावरच चालत असतं त्यामुळे जगभरातले तज्ज्ञ चिंतेत आहेत.

भारत हा आशियातला तिसरा मोठा तेल खरेदी करणारा देश आहे. सध्या 21 दिवसांचा लॉकडाउन असल्याने मागणी एकदम घटली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत असलेले पेट्रोल डिझेल आता रद्दीच्या भावात विकलं जाणार अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली  आहे.

जगभर कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चीननंतर आता इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये झापाट्याने त्याचा प्रसार होत आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा 21 हजारांवर गेला आहे. तर 4 लाख 72 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा लवकरच 5 लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज   Johns Hopkins Universityच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

वाचा - कोरोनामुळे झाला मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आणि नंतर 'अशी' घेतली खबरदारी

कोरोनामुळं साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी आता एक आनंदाची बातमी आली आहे. नोबेल पारितोषिक विजेते आणि स्टॅनफोर्ड बायोफिझिक तज्ज्ञ मायकल लेव्हिट यांनी कोरोनाव्हायरस लवकरच मरेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

वाचा - Nostalgic: पुन्हा राम अवतरणार! पुन्हा रस्त्यांवर शुकशुकाट होणार...

मायकल यांच्या मते, जगातील कोरोना विषाणूचा सर्वात वाईट टप्पा आधीच संपला आहे. कोरोनाच्या मृतांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत 21 हजार लोकांचा मृत्यू झाला असला तरी 1 लाखांहून अधिक लोक निरोगीही झाले आहेत. त्यामुळं कोरोनावर मात करू शकतो, अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

 

 

First published: March 26, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading