Home /News /national /

कडक सल्यूट! पत्नी 9 महिन्यांची गरोदर तरी हे कर्मचारी करतायत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार

कडक सल्यूट! पत्नी 9 महिन्यांची गरोदर तरी हे कर्मचारी करतायत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार

परिहार यांच्या पत्नी मानसशास्त्रज्ञ असून त्यांना प्रसूतीची तारीख 18 मार्च देण्यात आली होती. मात्र प्रसूतीच्या कळा आल्या नसल्यामुळे त्यांना आणखी एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे.

    रायपूर, 23 मार्च : कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत लॉक डाऊन करण्यात आले आहे. असे असले तरी वैद्यकीय कर्मचारी मात्र या परिस्थतीतही लोकांच्या सेवेसाठी झटत आहेत. असेच एक छत्तीसगडमधील वैद्यकीय सहाय्यक कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेत आहेत. यांचे नाव आहे हे डोगेंद्र परिहार. छत्तीसगडमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढ्यात वैद्यकीय कर्मचारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यांची पत्नी गरोदर असूनही दिवसरात्र लोकांची सेवा करत आहेत. या वैद्यकीय सहाय्यकाची पत्नी 9 महिन्यांची गरोदर असून सध्या ते आरोग्य विभागात आरएमएचे काम करत आहेत. सध्या विमानतळावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांना 14 दिवस वेगळे ठेवले जात आहे. डोगेंद्र परिहार सध्या विमानतळावर काम करत असून त्यांची पत्नी 9 महिन्यांची गरोदर आहे. धक्कादायक! कोरोनाचा धोका वाढला, राज्यात एका दिवसात आढळले 15 नवे रुग्ण परिहार यांनी याबाबत सांगताना, दररोज 2000 हून अधिक प्रवासी विमानतळावर दाखल होतात, त्यामुळे संसर्ग झाल्यास आव्हाने मोठी असतात. आम्हाला कायम सतर्क राहावे लागते, अशी माहिती दिली. तर पत्नीबाबत परिहार यांनी, "माझी पत्नी नऊ महिन्यांची गरोदर आहे. तिला घरी सांभाळायला कोणी नाही. माझ्या डोक्यात सतत तिचा विचार असतो. पण अशा काळात मी माझे कर्तव्य आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी विसरू शकत नाही. माझ्यापेक्षा माझ्या पत्नीचे कौतुक केलं पाहिजे", असे सांगितले. पत्नीला देण्यात आली होती 18 मार्चची तारीख परिहार यांच्या पत्नी मानसशास्त्रज्ञ असून त्यांना प्रसूतीची तारीख 18 मार्च देण्यात आली होती. मात्र प्रसूतीच्या कळा आल्या नसल्यामुळे त्यांना आणखी एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. परीहार यांची पत्नी निरुपमा यांनी, "सध्या जी परिस्थिती आहे त्यात माझ्यापेक्षा जास्त माझ्या पती देशाला गरज आहे. सुजाण नागरिकांना विनंती आहे की त्यांनी वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांना सहकार्य करावे", असे सांगितले. डोगेंद्र परिहार विमातळावर आहेत नोडल अधिकारी गेल्या दहा वर्षांपासून आरोग्य विभागात मेडिकल असिस्टंट (आरएमए) म्हणून कार्यरत असलेल्या डोगेंद्र परिहार यांनी कोरोना विषाणूची राज्यात प्रवेश होऊ नये म्हणून विमानतळावर कमांडची जबाबदारी स्वीकारली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये परिहार यांची विमानतळावरील नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सध्या व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ते कार्यरत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊन पुरेसे नाही तर..., WHOच्या वक्तव्याने खळबळ
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या