नवी दिल्ली 23 मार्च : मंदीच्या सावटाखाली असलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे प्रचंड मोठा हादरा बसलाय. जगभरातल्या सर्वच अर्थव्यवस्था यामुळे कोलमडण्याच्या स्थितीत असून पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाच कुणालाच येत नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या उद्योग संघटना आणि उद्योगपतींशी संवाद साधला. देशाच्या अर्थव्यवस्थेवर या संकटाचा काय परिणाम होईल आणि त्यातून मार्ग कसा काढायचा यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. एकूणच अर्थव्यवस्थेत बळकटी आणण्यसाठी नरेंद्र मोदी हे मोठ्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. यात उद्योगांना सवलती मिळण्याची शक्यता आहे.
या आधी पंतप्रधानांनी औषध निर्मात्या कंपन्यांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली होती. या क्षेत्राला 14 हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणाही सरकारने केली आहे.
कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या (24 मार्च) मध्यरात्रीपासून आंतरराज्यातील विमानाची उड्डाणं बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आतंरराज्य विमानांना उद्या रात्री 11.59 मिनिटांपर्यंत सर्व विमानांचं सुरक्षित लॅंडिंग करण्यास सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत देशात 9 जणांचा कोरोनामुळे (Covid - 19) मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आंतरराज्यातील विमान उड्डाणे बंद करण्यात येणार आहे.
Corona Latest Update - देशभरात 19 राज्य पूर्णतः लॉकडाउन
Spoke to those associated with the world of industry earlier this evening. In consultation with all the concerned stakeholders, the Government is working to ensure economic stability. #IndiaFightsCorona https://t.co/HhnTNj5ryn
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020
देशभरातल्या Coronavirus च्या परिस्थितीची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतो आहे. आतापर्यंत देशात 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात 19 राज्यांमध्ये लॉकडाउची परिस्थिती आहे. आणखी 6 राज्यांमध्ये अंशतः लॉकडाउनची परिस्थिती आहे.