बाप रे! महिलेच्या पोटातून काढली 24 किलो वजनाची गाठ, डॉक्टरही झाले हैराण

बाप रे! महिलेच्या पोटातून काढली 24 किलो वजनाची गाठ, डॉक्टरही झाले हैराण

सध्या या महिलेची प्रकृती ठिक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : रुग्णासाठी डॉक्टर हेच देव असतात कारण ते त्याचे प्राण वाचवतात. देवासमान असणाऱ्या डॉक्टरनं महिलेला एका मोठ्या संकटातून वाचवलं आहे. कोरोनाच्या काळात महिलेवर ट्यूमरचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गाठ 24 किलो वजनाची असल्याचं समोर आलं आहे. या ऑपरेशन नंतर डॉक्टरही हैराण झाले.

मेघालयमध्ये वेस्ट गोरा हिल्स जिल्ह्यातील एका रुग्णालयात महिलेवर शस्रक्रिया करण्यात डॉक्टरांना मोठं यश आलं. या महिलेच्या पोटातून 24 किलो वजनाची गाठ काढली आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार इस्ट गारो हिल्स जिल्ह्यातील जामगे गावात राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेच्या पोटात अचानक कळा येऊ लागल्या आणि या कळा असह्य झाल्यानं तातडीनं रुग्णालय गाठलं.

या महिलेला 29 जुलैला तूरा इथल्या प्रसूतीगृहात भर्ती करण्यात आलं. डॉक्टरांच्या टीमनं 3 ऑगस्ट रोजी या महिलेवर शस्रक्रिया केली. त्यावेळी या महिलेच्या पोटातून 24 किलोची गाठ काढण्यात आली. या घटनेनं डॉक्टरही चक्रावून गेले.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये नुकसान झालं म्हणून कंपनी मॅनेजरने केली चरसची तस्करी

सध्या या महिलेची प्रकृती ठिक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेच्या पोटातील गाठ तपासणीसाठी पाठवण्यात आली असून कॅन्सरची नसल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्रक्रियेनंतर मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून डॉक्टरांच्या टीमचं अभिनंदन केलं.

देशात काही ठिकाणी कोरोनाच्या काळात ठिकाणी उपचार नकारले जात असताना मेघालयात डॉक्टरांनी मोठी जोखीम उचलून या महिलेचा जीव वाचवला आणि तातडीनं उपचार केले त्यासाठी या टीमचं मेघालयाच्या मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांनी विशेष कौतुक केलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 6, 2020, 11:04 AM IST

ताज्या बातम्या