अहमदाबाद, 28 मे : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धपातळीवर वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आणि नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी गुजरात सरकारनं आता धन्वंतरी रथ ही अनोखी मोहीम राबवली आहे. यामध्ये एक मोठी व्हॅन असेल ज्यामध्ये डॉक्टर आणि तपासण्यासाठी आवश्यक ते सामान आणि औषधांचा साठा असेल. ही व्हॅन फिरती व्हॅन असेल. आवश्यक त्या ठिकाणी रुग्णांची किंवा नागरिकांची तापासणी कऱण्याचं काम या व्हॅनमध्ये केलं जाणार आहे.
अहमदाबाद मेट्रो कॉर्पोरेशनच्या 14 कंटमेंट झोनमध्ये अशा पद्धतीचे धन्वंतरी रथ सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. या व्हॅनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा रुग्णाचं थर्मल स्कॅनिंग केलं जाणार आहे. रुग्णाची तपासणी आणि पॅरामेडिकल स्टाफ रुग्णाला मधुमेह आहे की नाही याची तपासणी करेल. त्यानंतर रुग्णाला पुढची ट्रिटमेंट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
संपादन क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.