मराठी बातम्या /बातम्या /देश /

डबल बेडच्या बॉक्समध्ये अडकली 84 वर्षीय महिला, पोलिसांनी असा वाचवला जीव

डबल बेडच्या बॉक्समध्ये अडकली 84 वर्षीय महिला, पोलिसांनी असा वाचवला जीव

जवळपास 10 ते 15 मिनिटं वृद्ध महिला बॉक्समध्ये अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जवळपास 10 ते 15 मिनिटं वृद्ध महिला बॉक्समध्ये अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जवळपास 10 ते 15 मिनिटं वृद्ध महिला बॉक्समध्ये अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    नवी दिल्ली, 17 जुलै: कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी अनेक वृद्ध लोकांना आपला जीव धोक्यात घालून मदत केली. गुरुवारी 84 वर्षीय आजीसाठी पोलीस पुन्हा एकदा देवासारखे धावून आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडला. प्रसाद नगर परिसरात एकट्या राहणाऱ्या 84 वर्षीय महिला स्वर्ष कोहली यांचा जीव दिल्ली पोलिसांनी वाचवला. अलकनंदा परिसरातून नन्सी नावाच्या महिलेनं प्रसाद नगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माहिती दिली. या नन्सीची आजी एकटी घरात राहात असल्याची माहिती तिने पोलिसांना सांगितलं. गुरुवारी दुपारी डबल बेडच्या बॉक्समध्ये आजी अडकल्याची माहिती नातीनं पोलिसांना दिली. हे वाचा-क्रीडा विश्वाला झटका, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे कोरोनामुळे निधन नन्सीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन 84 वर्षीय वृद्ध महिलेचा जीव वाचवला. जवळपास 10 ते 15 मिनिटं वृद्ध महिला बॉक्समध्ये अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही वेळात नन्सी आणि तिचा पती घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. एका फोनवर पोलीस वेळेत पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता मात्र पोलीस देव बनून आले आणि त्यांनी जीव वाचवल्यानं नन्सी आणि तिच्या पतीनं कृतज्ञता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांचं कौतुक होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या