कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दिल्ली ते पुणे आहेत 'हे' निर्बंध

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दिल्ली ते पुणे आहेत 'हे' निर्बंध

कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही दिल्ली-नोएडा सीमा पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. 25 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एका राज्यांतून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. एकीकडे महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे तर दुसरीकडे दिल्ली, उत्तर प्रदेशात अनेक भाग हॉटस्पॉट असल्यानं आता दिल्ली-नोएडा बॉर्डर पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गौतम बुद्ध नगरच्या डीएम यांनी हे आदेश काढले आहेत. 'कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही दिल्ली-नोएडा सीमा पूर्णपणे बंद करीत आहोत, आरोग्य विभागाचा सल्ला आणि लोकहिताचा विचार मोठ्या प्रमाणात ठेवून आपण सहकार्य करावे ही विनंती. घरी राहा, सुरक्षित राहा.' कोरोनासाठी काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांना फक्त परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पुण्यातही लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत.

हे वाचा-Good News! महाराष्ट्रातला आणखी एक जिल्हा होणार कोरोनामुक्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रशासनाकडून आता नियमांचं कटेकोर पालन केलं जात आहे. लॉकडाऊनमध्ये आता आणखी नियम कठोर करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण जिथे सापडले अशा परिसरांमध्ये आता पूर्ण लॉकडाऊन कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढचे दोन दिवस भाजीपाला-किराणा दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणेकरांना आता फक्त 2 तास 10 ते 12 यावेळेत दूध मिळणार आहे. पुणे शहरातील 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे .कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनाचा कठोर पावलं उचलून हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी 552 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5000 पार गेला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

हे वाचा-मुंबईत पुन्हा मोठी वाढ, 24 तासांत 419 नवे कोरोनाचे रुग्ण; राज्याचा आकडा 5000 पार

First published: April 22, 2020, 7:05 AM IST

ताज्या बातम्या